IND vs NZ: बांगलादेशचा भारताला विरोध, पण राजकोट सामन्यात चक्क बांगलादेशी अंपायर! काय आहे नेमकं प्रकरण?
भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील राजकीय तणाव सध्या शिगेला पोहोचला आहे. 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतात येण्यास बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) पुन्हा एकदा नकार दिला आहे. मात्र, एकीकडे हा वाद सुरू असतानाच राजकोटमध्ये झालेल्या भारत-न्यूझीलंड दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशचे पंच (Umpire) शरफुद्दौला सैकत अंपायरिंग करताना दिसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बांगलादेश बोर्डाने सुरक्षा कारणास्तव आपल्या खेळाडूंना भारतात पाठवण्यास विरोध दर्शवला आहे. असे असतानाही शरफुद्दौला सैकत भारतात कसे आले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायर कोण असेल, याचा निर्णय कोणताही देश किंवा त्यांचे बोर्ड घेत नाही. सर्व अंपायर्स हे आयसीसीच्या (ICC) अंतर्गत येतात. कोणत्या सामन्यात कोणत्या देशाचा अंपायर असेल, याचे पूर्ण अधिकार फक्त आयसीसीकडे असतात. त्यामुळेच बांगलादेश बोर्डाचा विरोध असूनही, आयसीसीने नियुक्त केल्यामुळे शरफुद्दौला यांना भारतात येण्यापासून बोर्ड रोखू शकले नाही.
राजकोटमधील या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून भारताला फलंदाजी दिली. रोहित शर्मा आणि विराट कोहली लवकर बाद झाल्यामुळे टीम इंडियाची अवस्था 118 धावांत 4 विकेट अशी बिकट झाली होती. मात्र, के.एल. राहुलने (KL Rahul Century) 112 धावांची नाबाद शतकीय खेळी करत डाव सावरला. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे भारताने 50 षटकांत 284 धावांपर्यंत मजल मारली.
Comments are closed.