ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर

न्यूयॉर्क: अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर टाकला आहे. अमेरिकन सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय पहिल्यांदा 9 जानेवारीला देण्यात येणार होता. तो 14 जानेवारीला देण्यात येणार होता. मात्र, आज देखील देखील लांबणीवर टाकण्यात आला आहे.  अमेरिकन सुप्रीम कोर्टानं 14 जानेवारीला तीन प्रकरणांवर निर्णय दिले, यात टॅरिफच्या प्रकरणाचा समावेश नव्हता. संपूर्ण जगभरातून लक्ष अमेरिकन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लागलं होतं. मात्र, आज टॅरिफ संदर्भातील निर्णय जाहीर करण्यात आला नाही. याशिवाय पुढील काळात  सुप्रीम कोर्ट कधी निर्णय देणार हे देखील सांगितलं जात नाही, अमेरिकेत तशी पद्धत नाही.

तीन अमेरिकन कोर्टांचा टॅरिफ विरोधात निर्णय

अमेरिकेतील तीन कोर्टांनी टॅरिफ संदर्भात  डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निर्णय दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या कायद्यानुसार विविध देशांवर टॅरिफ लावलंय ते योग्य नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लादत त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन केलं आहे. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा केली होती. त्यानंतर तीन महिन्यांनी म्हणजेच जुलैमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती.

तज्ज्ञांच्या मते अमेरिकन सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय कारण या निर्णयाचे व्यापक परिणाम दिसून येणार आहेत. जर, सुप्रीम कोर्टाचा निर्णय ट्रम्प विरोधात गेला तर तो ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का असेल. यामुळं ट्रम्प यांच्या मनमानी निर्णयांना आळा बसेल. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या अनेक निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी इंटरनॅशनल इकोनॉमिक पॉवर्स अॅक्टचा वापर करुन दुसऱ्या देशावंर टॅरिफ लादलं आहे. या निर्णयाचा विरोध करणाऱ्या लोकांनी 1977 च्या या कायद्याचा वापर दुसऱ्या देशांवर टॅरिफ लागू करताना केला जाऊ शकत नाही, असं म्हटलं. ट्रम्प यांच्या समर्थकांच्या मते ट्रम्प यांनी अधिकारांचं उल्लंघन केलेलं नाही. ट्रम्प यांचा हा निर्णय देशहिताचा असल्याचं देखील त्यांचे समर्थक म्हणतात.

ट्रम्प यांच्याकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लादलं होतं. भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्यानं भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादण्यात आलं आहे. ट्रम्प यांनी म्हटलं की दंड म्हणून भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादण्यात आलं आहे. भारत, चीन सारखे देश रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं  रशियाला पैसे मिळतात त्याचा वापर ते यूक्रेन विरुद्ध करतात.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.