IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा

राजकोट: भारताला न्यूझीलंडकडून दुसऱ्या वनडेत 7 विकेटनं पराभव स्वीकारावा लागला आहे. केएल राहुलनं या मॅचमध्ये 112 धावांची खेळी केली होती. मात्र, न्यूझीलंडच्या डेरिल मिशेलच्या नाबाद शतकामुळं भारताचा पराभव झाला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 284 धावा केल्या होत्या. मात्र, भारताचे वेगवान गोलंदाज मॅच वाचवून शकले नाहीत.

फलंदाज अपयशी

भारताच्या पराभवाचं प्रमुख कारण म्हणजे खराब फलंदाजी होय. भारतानं नाबाद 70 धावांची सलामीची भागीदारी केली होती. तिथून 118 धावांपर्यंत भारतानं चार विकेट गमावल्या. यामुळं न्यूझीलंडला कमबॅक करण्याची संधी मिळाली. शुभमन गिलला चांगली सुरुवात मिळाली मात्र तो त्याचं रुपांतर शतकामध्ये करु शकला नाही. विराट कोहली आणि रोहित शर्मा चागंली फलंदाजी करु शकले नाहीत. भारताचा संघ 250 धावा पार करेल की नाही अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, के एल राहुलच्या शतकामुळं भारतानं 284 धावांपर्यंत मजल मारली.

शुभमन गिलचा चुकीचा निर्णय

न्यूझीलंडच्या संघानं 46 धावांवर 2 विकेट गमावल्या होत्या. 13 व्या ओव्हरमध्ये प्रसिद्ध कृष्णानं हेनरी निकल्सला बाद केलं होतं. त्या पुढच्या ओव्हरमध्ये गिलनं हर्षित राणा किंवा मोहम्मद सिराजला गोलंदाजी द्यायला हवी होती. त्याऐवजी शुभमन गिलनं नितीश कुमार रेड्डीला गोलंदाजी दिली. यामुळं डेरिल मिशेल आणि विल यंग यांना मैदानावर जम बसवण्यात मदत झाली. 14 व्या ओव्हरमध्ये मिशेल आणि यंग यांनी फटकेबाजी केली.

फिरकीपटूंची कामगिरी
भारताच्या फिरकीपटूंनी देखील आज निराशाजनक कामगिरी केली. कुलदीप यादवला मार पडला. त्यानं 10 ओव्हरमध्ये 82 धावा दिल्या. जडेजानं 8 ओव्हरमध्ये 44 धावा दिल्या. न्यूझीलंडच्या फलंदाजांवर दबाव आणण्यात ते अपयशी ठरले.

आणखी वाचा

Comments are closed.