IND vs NZ: हर्षित राणाचा वनडेत धुमाकूळ! 2025 पासून भारतासाठी ठरला सर्वात यशस्वी गोलंदाज
हर्षित राणा (Harshit Rana) सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून समोर येत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 24 वर्षीय हर्षित आपल्या गोलंदाजीने कहर बरपावत आहे. विशेष म्हणजे, 2025 सालापासून आतापर्यंत भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हर्षितच्या नावावर आहे.
हर्षित राणाने फेब्रुवारी 2025 मध्ये इंग्लंडविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळला होता. पदार्पणापासून आतापर्यंत 13 डावांमध्ये त्याने 23 विकेट्स घेतल्या आहेत. जरी त्याला अद्याप एकदाही ‘5-विकेट हॉल’ (एकाच सामन्यात 5 बळी) घेता आला नसला, तरी सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याने या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.
2025 पासून वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय:
हर्षित राणा: 23 विकेट्स (13 डाव)
कुलदीप यादव: 20 विकेट्स (12 डाव)
रवींद्र जडेजा: 12 विकेट्स
हर्षित राणा सातत्याने 140 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्यात सक्षम आहे. त्याने खेळलेल्या 13 सामन्यांपैकी केवळ दोनच वेळा असे घडले आहे की त्याला एकही विकेट मिळाली नाही. तो नवीन चेंडूने अतिशय प्रभावी गोलंदाजी करतो. त्याचबरोबर हर्षित अनेकदा महागडा ठरला आहे, विशेषत डेथ ओव्हर्स’मध्ये फलंदाजांनी त्याला लक्ष्य केले आहे. त्याने टी20 क्रिकेटमध्ये 6 सामन्यांत 7 विकेट्स तर कसोटी क्रिकेटमधील 2 सामन्यांत 4 विकेट्स घेतल्या आहेत.
Comments are closed.