Zepto आणि Swiggy कडून '10 मिनिटांत डिलिव्हरी' सेवा बंद.
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारच्या सूचनेनंतर गिग वर्कर्सशी संबंधित ‘10 मिनिटांमध्ये डिलिव्हरी’चा निर्णय प्रमुख प्लॅटफॉर्म झेप्टो, स्विगी आणि ब्लिंकिट यांनी मागे घेतला आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या थेट हस्तक्षेपानंतर आणि डिलिव्हरी भागीदारांच्या सुरक्षिततेबद्दल वाढत्या चिंतेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी गेल्या आठवड्यात या कंपन्यांसोबत बंद दाराआड बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी कंपन्यांना त्यांच्या ब्रँडिंगमधून ही दहा मिनिटांची वेळ मर्यादा काढून टाकण्याची सूचना केली होती. केंद्र सरकारच्या निर्देशांनंतर, क्विक कॉमर्स दिग्गजांनी त्यांच्या ब्रँडिंग आणि जाहिरातींमधून ‘10 मिनिटांमध्ये डिलिव्हरी’ हा पर्याय बंद करण्यास सुरुवात केली आहे.
Comments are closed.