Running Nose Remedies : हिवाळ्यातील सर्दीवर घरगुती उपाय

बदलत्या हवामानात सर्दी खोकला होणं ही एक सामान्य समस्या आहे. वातावरणातील बदलामुळे, व्हायरल बॅक्टेरियामुळे शरीरावर परिणाम होऊन अनेक आजार उद्भवतात. त्यामुळे हिवाळ्यात आरोग्याची काळजी घ्यायला हवी. तुम्हालाही थंडीत सतत सर्दी होत असेल तर यावरील घरगुती उपाय जाणून घेऊयात.

वाफ घ्यावी –

सर्दी झाली असेल तर वाफ घ्यावी. वाफ घेतल्याने गरम हवा नाकात आणि तोंडात जाते, ज्यामुळे सर्दी किंवा कफ कमी होतो.गरम पाण्याच्या भांड्यात निलगिरी तेल किंवा पेपरमिंट तेल टाकून वाफ घ्या. यामुळे नाक मोकळे होते.

हायड्रेट राहावे –

सर्दीमुळे नाकात श्लेष्मा जमा होतो. अशावेळी श्लेष्मा पातळ करण्यासाठी हायड्रेट राहणे आवश्यक असते. हायड्रेट राहण्यासाठी भरपूर पाणी, कॅमोमाइल सारखे हर्बल टी आणि सूप प्यावे.

मध आणि लिंबाचा रस –

कोमट पाण्यात मध आणि लिंबाचा रस मिसळून प्या. मध घशातील खवखव कमी करतो.

हळदीचे दूध –

रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात हळद घालून प्यावे. हळद रोगप्रतिकारशक्ती वाढवते. ज्यामुळे व्हायरल इन्फेक्शनपासून शरीराचा बचाव होतो.

मीठाच्या गुळण्या –

गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्याने घशातील खवखव कमी होते. सर्दीही कमी होते.

लसूण –

जेवणात लसूणचा वापर करा, तो सर्दीशी लढण्यास मदत करतो.

(टीप – ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

हेही वाचा – Child Mental Health: आई- वडिलांच्या ‘या’ सवयींमुळे बिघडते मुलांचे मानसिक आरोग्य

Comments are closed.