निवडणूक आयोगाच्या कारभाराचा थेट मंत्री गणेश नाईकांना फटका; तासभर फरफट होऊनही नाव सापडेना

निवडणूक 2026 नवी मुंबई: राज्यातल्या 29 महानगरपालिकांसाठी आज मतदानाची (महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक 2026) रणधुमाळी पार पडते आहे. सकाळी साडेसात ते साडेपाच दरम्यान नागरिकांना मतदान करता येणार आहे. मुंबईसह राज्यातील अनेक मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिकांनी रांग लावली आहे. याचदरम्यान मतदान केंद्रातील मतदारयाद्यांचा घोळ पुन्हा एकदा समोर आला आहे. तर दुसरीकडे या मतदार यादीमधील भोंगळ कारभाराचा फटका आता थेट राज्याचे वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) आणि त्यांच्या परिवाराला बसला आहे. दोन मतदान केंद्र फिरूनही गणेश नाईक यांचं नाव मतदार यादीत मिळत नसल्याचे दिसून आलं आहे.

दरम्यान, या घोळाबाबत गणेश नाईक यांनी निवडणूक आयोगावर (Election Commission) आगपक्षडी केली असून राज्याच्या जंगलमंत्र्यांचे आणि इथल्या आमदाराबाबत असं होत असले तर सर्वसामान्य जनतेचं काय? असा प्रश्न त्यांनी निवडणूक आयोगाला केला आहे. एकाच इमारतीत राहून एकाच कुटुंबातील सदस्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी नावं आली आहे. हा सगळा घोळ काळजीपालक असल्याचेहे ते म्हणाले.

निवडणूक 2026: एक तासाच्या धावपळीनंतर अखेर वनमंत्री गणेश नाईक आणि परिवाराचे मतदान पुर्ण

दरम्यान एक तासाच्या धावपळीनंतर अखेर वनमंत्री गणेश नाईक आणि परिवाराचे मतदान पुर्ण झालंहे. फक्त यावेळी गणेश नाईक याni निवडणूक आयोग यंत्रणेच्या घोळावर गंभीर आरोप केले आहे. यंत्रणा टू दी पॅांईट काम करीत नसल्याचा गणेश नाईक यांचा आरोप आहे. तर वनमंत्री गणेश नाईक आणि परिवार यांच्या परिवाराच्या मतदानाचा घोळ सकाळी ७.३० पासून सुरू होता. दोन मतदान केंद्रावर फिरूनही गणेश नाईक आणि परिवाराचे नाव मिळत नव्हते. हा घोळ एक तास सुरू होता. अखेर कोररखैरणे येथील सेंट मेरी हायस्कूल मधील मतदान केंद्रावर गणेश नाईक, संजीव नाईक, सुन कल्पना नाईक यांचे नाव मिळालेहे.

मात्र, पुतणे माजी महापौर सागर नाईक आणि त्यांची पत्नी यांचे नाव परिवारासह न येता वेगळ्या ठिकाणी आल्याचे दिसून आले. यामुळे नेहमी एकाच मतदान केंद्रावर मतदान करणारे संपुर्ण नाईक परिवार यावेळी मात्र निवडणूक आयोगाच्या घोळामुळे वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करावे लागले.

आणखी वाचा

Comments are closed.