वैभव सूर्यवंशीच्या बॅटचा आवाज आज पुन्हा घुमणार… U19 वर्ल्ड कपचा पहिला सामना कुठे पाहाणार LIV
भारत U19 वि यूएसए U19 थेट प्रवाह: अंडर-19 वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात आज 15 जानेवारीपासून होत आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेतील पहिला सामना भारत आणि यूएसएच्या युवा संघांमध्ये खेळवला जाणार आहे. आयुष म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या सामन्यात यूएसएवर मात करून स्पर्धेची दणदणीत विजयी सुरुवात करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. या सामन्यात पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्यावर असतील. सध्या तो जबरदस्त फॉर्ममध्ये असून सातत्याने धावा करत आहे. त्यामुळे उद्घाटन सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. चला तर मग जाणून घेऊया हा सामना कधी, कुठे आणि किती वाजता लाईव्ह पाहता येणार आहे.
सामना किती वाजता सुरू होणार?
अंडर-19 वर्ल्ड कप 2026 मधील भारत विरुद्ध यूएसए हा पहिला सामना आज खेळवला जाणार आहे. स्थानिक वेळेनुसार सामना सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. मात्र, भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 1 वाजता सुरू होईल. सामन्यापूर्वी 12.30 वाजता नाणेफेक (टॉस) पार पडेल.
U19 वर्ल्ड कप 2026 सामने कुठे पाहता येतील?
अंडर-19 वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचे सर्व सामने तुम्ही टीव्ही आणि मोबाईल दोन्हीवर पाहू शकता. या स्पर्धेचे लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाणार आहे. तसेच, सामन्यांची लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार ॲपवर उपलब्ध असेल.
टीम इंडियाचा ग्रुप आणि वेळापत्रक
अंडर-19 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय संघ ग्रुप-ए मध्ये आहे. या गटात भारतासोबत न्यूझीलंड, बांगलादेश आणि यूएसए हे संघ आहेत.
- 15 जानेवारी – भारत विरुद्ध यूएसए
- 17 जानेवारी – भारत विरुद्ध बांगलादेश
- 24 जानेवारी – भारत विरुद्ध न्यूझीलंड
वैभव सूर्यवंशीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा
वैभव सूर्यवंशी जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो, तेव्हा क्रिकेटप्रेमींच्या नजरा त्याच्यावर खिळतात. अंडर-19 वर्ल्ड कप 2026 मध्येही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या युवा वनडे मालिकेत त्याने दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा हा युवा स्टार भारतासाठी निर्णायक भूमिका बजावेल, अशी आशा सर्वांनाच आहे.
IND U19 VUSA U19 Donhi संघ –
भारत: आयुष म्हात्रे (कर्नाधर), आर.एस. अम्ब्रिस, कनिष्क चौहान, डी. दीपेश, मोहम्मद अनन, आरोन जॉर्ज, अभिज्ञान कुंडू, किशन कुमार सिंग, विहान मल्होत्रा, उद्धव मोहन, हेनिल पटेल, खिलन ए. पटेल, हरवंश सिंग, वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी
यूएसए: उत्कर्ष श्रीवास्तव (कर्णधार), अदनीत झांब, शिव शनी, नितीश सुदिनी, अद्वैत कृष्णा, साहिर भाटिया, अर्जुन महेश, अमरिंदर गिल, सबरीश प्रसाद, आदित कप्पा, साहिल गर्ग, अमोघ रेड्डी अरेपल्ली, ऋत्विक अप्पीडी, रायन ताज, ऋषभ शिंपी.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.