40 हून अधिक 'बीएलओ'नी राजीनामे दिले आहेत.

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये ‘एसआयआर’वरून गोंधळ

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालमधील विशेष सघन पडताळणीवरून (एसआयआर) वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुर्शिदाबाद जिह्यातील फाराका ब्लॉकमध्ये तणाव वाढला. फाराका ब्लॉकमधील 40 हून अधिक बूथ लेव्हल ऑफिसर्सनी (बीएलओ) ‘एसआयआर’शी संबंधित समस्या आणि दबावाच्या निषेधार्थ सामूहिक राजीनामा दिला. त्यानंतर संतप्त कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांनी निवडणूक नोंदणी अधिकारी कार्यालयाची तोडफोड केल्यामुळे प्रशासनात घबराट पसरली.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक तृणमूल काँग्रेसचे आमदार मनीरुल इस्लाम घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासमोर कार्यालयाची तोडफोड सुरू होती.  आमदारांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर परिस्थिती काही प्रमाणात सामान्य झाली. तथापि, या घटनेमुळे एसआयआरबाबत तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये असलेली असंतोष अधोरेखित झाला आहे.

Comments are closed.