हायवे प्रकल्पांमध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप
प्राधिकरणाचा पुढाकार : उच्च शिक्षण विभागाची भागीदारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उच्चशिक्षण संस्थांसाठी एक खास इंटर्नशिप कार्यक्रम सुरू केला आहे. इंजिनियरिंग महाविद्यालयांचे विद्यार्थी आता 150 हून अधिक राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष अनुभव प्राप्त करू शकणार आहेत. या कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रत्येक प्रकल्प विद्यार्थ्यांना प्राधिकरणाची आधुनिक इंजिनियरिंग आव्हाने आणि नवनव्या नवोन्मेषाचा प्रत्यक्ष अनुभव देणार आहे, यामुळे पुढील पिढीचे प्रोफेशनल्स देशाच्या पायाभूत विकासात योगदान देण्यासाठी तयार होतील असे उद्गार उच्च शिक्षण विभागाचे सचिव डॉ. विनीत जोशी यांनी काढले आहेत.
या कार्यक्रमाच्या अंतर्गत निवडण्यात आलेल्या सर्व इंटर्ननला शिकणे, प्रवास आणि प्रोफेशनल ग्रोथमध्ये सहाय्यासाठी दर महिन्याला 20 हजार रुपयांचा स्टायपेंड दिला जाणार आहे. इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांबद्दल जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. दोन महिने आणि 6 महिन्यांच्य इंटर्नशिपची संधी मिळू शकणार आहे. प्रत्येक प्रकल्पात 4 इंटर्न असतील, आयआयटी, एनआयटी आणि एआयसीटीईशी निगडित संस्थांच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी प्राप्त होणार आहे.
600 विद्यार्थ्यांपासून सुरुवात
हा इंटर्नशिप कार्यक्रम भविष्यात पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी देखील विस्तारित केला जाणार आहे. प्रारंभी इंजिनियरिंग संस्थांच्या जवळपास 600 विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. भारतीय उच्चशिक्षण संस्थांची जागतिक ओळख आणि कामगिरीला सुधारण्यासाठी शिक्षण मंत्रालय सातत्याने प्रयत्न करत आहे. ग्लोबल रँकिंग फ्रेमवर्कविषयी संस्थांना मार्गदर्शन केले जात आहे.
कार्यशाळांचे आयोजन
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगवर संस्थांसाठी ओरिएंटेशन आणि प्रशिक्षण कार्यशाळाही आयोजित केल्या जात आहेत. क्यूएस रँकिंग पॅरामीटरचा ओव्हरह्यू भारतीय एचईआयच्या समोर येणारी आव्हाने, रिसर्च आउटपूट, शैक्षणिक प्रतिष्ठा आणि आंतरराष्ट्रीय विस्ताराला प्रभावी करण्यासाठी काय केले जाऊ शकते याची माहिती संस्थांना देण्यात येत आहे.
Comments are closed.