वाहन अपघातात तरुणाचा मृत्यू

टेम्पोला मोटरसायकलची धडक लागल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. फरहान शेख असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
फरहान हा गोरेगावच्या भगतसिंग नगर येथे राहत होता. तो ओशिवरा येथे मेट्रो स्थानकात इंटर्नशिप करत होता. मंगळवारी रात्री फरहान नेहमीप्रमाणे कामावर मोटरसायकल घेऊन गेला. फरहान हा मित्रांसोबत मोटरसायकलने माहीम येथे दर्ग्यात गेला होता. माहीम येथून दर्शन केल्यावर तो घरी जात होता. फरहान हा मोटरसायकल चालवत होता.
आज सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास त्याची मोटरसायकल मिलन सब वे परिसरात आली. अचानक टेम्पो थांबल्याने फरहानची मोटरसायकल त्या टेम्पोला धडकली. त्या अपघातात फरहान आणि शाहिद खान हे जखमी झाले. त्यांना इर्शाद नावाच्या मित्राने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान फरहानचा मृत्यू झाला, तर शाहिदवर उपचार सुरू आहेत. घडल्या प्रकाराची माहिती समजताच विलेपार्ले पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

Comments are closed.