IND vs NZ: विराट कोहलीने 23 धावांवर बाद होऊनही इतिहास रचला, सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडला
स्वस्तात बाद होऊनही कोहलीने खास विक्रम केला. न्यूझीलंडविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कोहली आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. कोहलीच्या आता न्यूझीलंडविरुद्ध 35 डावांत 1773 धावा झाल्या आहेत. या यादीत त्याने सचिन तेंडुलकरला मागे सोडले, ज्याने आपल्या कारकिर्दीत किवी संघाविरुद्ध 41 डावात 1750 धावा केल्या होत्या.
या यादीत रिकी पॉन्टिंग 50 डावात 1971 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
Comments are closed.