बोटावरील शाई पुसली जातेय, पुरावेही समोर; राज ठाकरे संतापले, आता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म

देवेंद्र फडणवीस ऑन राज ठाकरे मतदार शाई बीएमसी निवडणूक 2026: विरोधी पक्षांकडून सातत्याने निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका उपस्थित केली जात असताना मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानावेळी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबईत आज सकाळी मतदान करुन आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणावर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. (Mumbai Municipal Corporation Election 2026)

सरकारने निवडणुका जिंकायचे ठरविले आहे. जे विधानसभेला केले ते आता करत आहे पण आम्ही होऊ देणार नाही. आजपर्यंत शाई लावली जायची, पण आता मार्करने खूण करण्यात येत आहे. सॅनिटाईजरने ही खूण पुसली जातेय. फ्रॉड निवडणुकांमधून सत्तेत येणे, याला निवडणुका म्हणत नाही, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला. सदर प्रकरणावर आणि राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Raj Thackeray Voter Ink)

ऑईल पेंटचा वापर केला पाहिजे- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Voter Ink)

निवडणुकांबाबत सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ठरवतं. याआधीही मार्करचा वापर झाला आहे. जर काही न शंका असेल तर निवडणूक आयोगाने दुसऱ्या पेनचा वापर केला पाहिजे. मी तर म्हणतो की, ऑईल पेंटचा वापर केला पाहिजे. मात्र निवडणुकीशी संबंधित संस्थानवर अशा पद्धतीने संशय निर्माण करणे योग्य नाही, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भूषण गगराणी यांचे चौकशीचे आदेश- (BMC Election 2026)

बोटावर लावण्यात असलेली शाई पुसली जात असल्याप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे चौकशीचे आदेश दिले आहेत. शाई पुसली जाते असे काही व्हिडिओ प्राप्त झाल्यानंतर पालिका आयुक्तांकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मार्करच्या मदतीने शाई लावली जात असल्याने शाई सहज पुसली जात असल्याचा मतदारांना संशय आहे. शाई त्वचेला लागेल अशी गडद लावा, अशा सूचना आता देण्यात आल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय? (Voting Ink Mumbai)

राज्य निवडणूक आयोगाकडून यंदा मतदानासाठी शाईऐवजी मार्करचे किट उपलब्ध करुन देण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. हा मार्कर 2012 पासून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरला जात असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?, VIDEO:

संबंधित बातमी:

BMC Election 2026 Voting: मोठी बातमी: मुंबईत मतदान करुन परतलेल्यांच्या बोटावरची शाई पुसली, एकच खळबळ, आयुक्त म्हणाले…

आणखी वाचा

Comments are closed.