आता बांगलादेश क्रिकेट बोर्ड-खेळाडूंमध्येच वाद, वाचा काय आहे नेमके प्रकरण
भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजकीय वादाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर बांगलादेश क्रिकेटवर झालेला दिसून येत आहे. याआधीच बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) यंदा होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी भारतात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे, तर आता बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि स्थानिक तसेच वरिष्ठ खेळाडूंमध्ये वाद निर्माण झाला आहे. यामध्ये खेळाडूंनी बीसीबीचे अध्यक्ष आणि चेयरमन नजमुल इस्लाम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी राजीनामा नाही दिला तर खेळाडू बांगलादेश प्रीमियर लीग आणि कोणत्याच स्थानिक स्पर्धांमध्ये खेळणार नाही, अशी भुमिका घेतली आहे.
वाद असा आहे की नजमुल यांनी वृत्तमाध्यमांसमोर विधान करताना म्हटले, “बांगलादेश आयसीसी पुरूष टी20 विश्वचषक नाही खेळला तर यामुळे बोर्डाचे नाहीतर खेळाडूंचे नुकसान होईल आणि बोर्ड त्यांना कोणतीही आर्थिक भरपाई देऊ शकणार नाही.” नजमुल यांच्या या विधानावरच काहीनी नाराजी व्यक्त केली आहे.
क्रिकेटर्स वेलफेयर असोसिएश ऑफ बांगलादेश (CWAB) यांनी ताबडतोब एक पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये खेळाडूंचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ खेळाडू मोहम्मद मिथुन यांनी नजमुल यांच्या विधानांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांने केलेले विधान खेळाडूंचे अपमान करणारे आहे, अशी माहिती समोर येत आहे.
“आम्ही नेहमीच शांत राहिलो, मात्र बोर्डाने खेळाडूंचा अपमान केला आहे. खेळाडू केवळ त्यांच्या या विधानामुळे नाही नाराज नाही तर मागील काही महिन्यांपासून हे सुरू आहे. त्यांनी जर राजीनामा नाही दिला तर देशात ज्या क्रिकेट स्पर्धा होत आहेत त्या थांबवू”, असेही मिथुन पुढे म्हणाले.
मिथुन यांच्या भुमिकेमुळे बोर्डने लगेचच हालचाली सुरू केल्या आहेत. नजमुल यांच्या विधानामध्ये बोर्डाची काही भुमिका नाही. तसेच खेळाडूंना दुखावणारे आणि अपमानास्पद वागणूक देणाऱ्यांना बोर्ड साथ देत नाही. खेळाडू हे संघासाठी आणि राष्ट्रासाठी महत्वाचे असतात, असे वक्तव्य बोर्डाने सादर केले आहे.
Comments are closed.