निवडणुक आयोगाचा भोंगळ कारभार, उमेदवाराच्या समोरील बटण दाबलेच गेले नाही

फोटो प्रातिनिधिक

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजेपासून मतदान सुरू झाले आहे. मात्र अनेक केंद्रांवर गोंधळ पाहायला मिळाल्याने निवडणुक आयोगाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. अशातच दादरच्या बालमोहन विद्यामंदिर येथे एका मतदान यंत्रात बिघाड झाल्याने खळबळ उडाली . यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या विशाखा राऊत यांच्यासमोरील बटण दाबलं जात नाही अशी तक्रार काही मतदारांनी केली. त्यांनतर 20 मिनीटे मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मतदारांच्या तक्रारीनंतर मशिन बदलण्यात आली आणि मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु केली.

Comments are closed.