इथे सगळे महानगरपालिकेच्या मतदानात गुंतले, तिकडे अजितदादांनी झेडपी निवडणुकीचा प्रचाराचा नारळही फ
पुणे: आज राज्यात २९ महानगरपालिकांसाठीची मतदान प्रक्रिया पार पडत आबे, उद्या (१६ जानेवारीला) या निवडणुकीचा निकाल लागणार आहे, अशातच अजित पवारांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा पुण्यात नारळ फोडला असल्याचं दिसून येत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीतील राष्ट्रवादी भवन मध्ये कार्यकर्ता मेळावा घेतला. याप्रसंगी अजित पवारांनी अनेक महत्त्वाच्या घडामोडींवरती भाष्य केलं आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका 16 जानेवारीपासून आहेत, नामनिर्देशन पण दाखल करता येणार आहे. कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड छत्रपती संभाजीनगर नागपूर धाराशिव आणि परभणी या 12 जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे. बाकीच्या जिल्हा परिषदांसाठी 50% च्या आरक्षण ठेवल्यावर आम्ही तुम्हाला परवानगी देऊ असे सुप्रीम कोर्टाची निर्देश आहेत. सुप्रीम कोर्टाने सांगितले होते सर्व स्थानिक स्वराज्य संस्था 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करा. आज 29 महानगरपालिकांचे मतदान राज्यांमध्ये होत आहे. जिल्हा परिषद आणि तालुका पंचायती आता बाकी आहेत त्यापैकी 12 जिल्हा परिषद निवडणुका आणि त्यांच्या तालुका पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम लावलेला आहे. सुप्रीम कोर्टाला विनंती करण्यात आली होती की 31 तारखेच्या आत संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम संपवता येत नाही, त्यामुळे जिल्हा परिषदेला 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिलेली आहे. निवडणूक आयोगानं 16 जानेवारीपासून 21 जानेवारीपर्यंत नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जातील. 22 जानेवारी रोजी छाननी प्रक्रिया पार पडेल, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
सत्तावीस जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत
पुढे अजित पवार म्हणाले, प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन याला सार्वजनिक सुट्ट्या असतात, त्यामुळे सत्तावीस जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत ठेवली आहे. 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडेल. प्रचारासाठी अवघे आठ दिवस मिळत आहेत. मतमोजणी सात फेब्रुवारी रोजी ठेवली आहे. बारा जिल्हा परिषद आणि त्यातील सर्व तालुका पंचायतींचा सर्व निकाल सात फेब्रुवारी रोजी लागेल. आपण बरेच अजून महानगरपालिकेच्या प्रचाराच्या धामधुमीत होतो. बारामती मधील अनेकांनी महानगरपालिकांसाठी प्रचारात मदत केली. उद्या महानगरपालिकांचा निकाल हाती येईल. नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका काही दिवसापूर्वी पार पडल्या. बारामती नगर परिषदेच्या करिता नगराध्यक्ष म्हणून सचिन सातव निवडून आले. 41 जागांपैकी पक्षाच्या चिन्हावर उभे केलेल्या साधारण 35 जागा निवडून आल्या आणि सहा वेगवेगळ्या विचाराचे लोक निवडून आले. त्यात अपक्ष निवडून आलेल्या तीन सहकाऱ्यांनी बारामतीत झालेला सर्वांगीण विकास पाहून आपल्याला आपल्या सोबत सहयोगी राहण्याचे कबूल केलं सह्या दिल्या. स्वीकृत नगरसेवकांच्या चार जागा आता आपल्याला भरता येणार आहेत कारण त्यासाठी आवश्यक असणारा कोटा आपण या तिघांच्या मदतीने पूर्ण केला आहे. माळेगाव नगरपंचायतीला सुहास सातपुते निवडून आलेले आहेत. माळेगावकरांचे आणि बारामतीकर यांचे दोघांचेही मी मनापासून आभार मानतो, असंही अजित पवारांनी पुढे म्हटलं आहे.
तर बारामतीच्या उपनगराध्यक्षाची निवडणूक 16 जानेवारी रोजी होणार आहे, त्यासाठी अनेकांनी माझ्याकडे अर्ज दिले आहेत. जसं साखर कारखान्यात पाच वर्षाकरिता वेगवेगळ्या गटात आपण पाच उपाध्यक्ष करतो तसाच पॅटर्न बारामती नगरपालिका आणि माळेगाव नगरपंचायत मध्ये राबवणार आहोत. पाच वर्षाकरिता पाच बहिण किंवा बांधवांना संधी देण्याचं धोरण आपण ठरवलं आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या बाबतीत यावर्षी काही वेगळे नियम अचानक लावले गेले याबाबतीत कोणालाच काही माहीत नव्हतं. स्वीकृत नगरसेवक यांच्या नियमावली ठरवण्यात आल्या. त्यामध्ये त्यांना पाच वर्षाचा व्यवसायिक अनुभव असला पाहिजे. डॉक्टर इंजिनियर वकील सीए किंवा प्राध्यापक असल्या पाहिजे असे नियम आहेत. काही लाख संस्था रजिस्ट्रेशन झाल्या मधल्या काळात काही संस्था रजिस्ट्रेशन करण्यात आल्या आणि नंतर त्या बंदही पडल्या. माळेगाव नगरपंचायतीला आपण एका ठिकाणी वकिलाला आणि एका ठिकाणी रामोशी समाजाच्या व्यक्तीला संधी दिली आहे. त्यांचे राजीनामे देखील आपण घेऊन ठेवलेले आहेत अशाच प्रकारचा निर्णय बारामतीत आपण करत आहोत. दरवर्षी ही स्वीकृत नगरसेवक आपण बदलत जाणार आहोत अनेकांना संधी देण्याचा आपला माणूस आहे. चॅरिटी कमिशनरकडे नोंद असलेल्या अशासकीय संस्थेचे पदाधिकारी हेदेखील स्वीकृत नगरसेवकाला पात्र आहेत असे अजित पवारांनी म्हटले आहे.
बाकीचे आरक्षण खाजगी जागेवर प्रस्थापित करण्यात आली
उद्या माळेगाव नगर पंचायतीची पहिली मिटींग आहे. त्या बैठकीत आपल्याला कुठल्याही परिस्थितीत निवडून आलेल्या सर्वांनाच माझं सांगणं आहे, विकास योजना म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन करिता नागरिकांना त्या भागातील हरकती सूचना करण्याची परवानगी असते याची अंतिम मुदत 17 तारखेला संपत आहे. बारामतीला जसा आपण रिंग रोड टाकला तसाही माळेगावच्या कार्यक्षेत्रात माळेगाव कारखाना येत असल्याने परिसर वाढत असल्याने पुढे काही वर्षात माळेगाव बारामती आणि इकडे पिंपळीपर्यंत एकच होणार आहे. माळेगाव नगरपंचायतीच्या हद्दीत शासकीय जागा जास्त आहेत, त्यामुळे 33 आरक्षण आपण त्या जागांवर टाकले आहेत. त्यानंतर मग बाकीचे आरक्षण खाजगी जागेवर प्रस्थापित करण्यात आली आहेत, अशी माहितीही अजित पवारांनी यावेळी दिली आहे.
राज्य सरकारच्या योजना पण मी आणण्याचा प्रयत्न करत आहे
तुम्ही मला साथ देत आहात, मी तुमच्या सर्वांच्या पाठिंबाच्या जोरावर राज्यात, जिल्ह्यात काम करत असताना आपल्या या सर्व संस्था जिल्हा परिषदेचे मतदान संपलं की पुढे साडेतीन वर्ष कुठली निवडणूक नाही. फक्त आपल्याला काम करायचा आहे मी बरोबर नियोजन केला आहे. पण काही सवयी तुम्ही मोडा ना, मी काम करतोय, आज सकाळी सहा वाजता मी अधिकारी बोलवले होते, कोणावर अन्याय होऊ देणार नाही. जिथून रिंग रोड जाईल तिथे काहींची जमिनी जातील पण राहिलेल्या जमिनीच्या किमती चार पटीने वाढतील. मला नंतर कळेल बोलला तसं झालं बाबा. बरीचशी लोक आता बारामतीत राहायला पसंद करायला लागली आहेत, राज्य सरकारच्या योजना पण मी आणण्याचा प्रयत्न करत आहे, असंही अजित पवारांनी पुढे म्हटलं आहे.
एक नंबरची नगरपंचायत मला माळेगावची करायची
पुढे अजित पवार म्हणाले, पालखीतळाच्या जागा जर उद्या दुसऱ्या कामासाठी गेल्या तर वारकऱ्यांनी कुठे थांबायचं ? त्यामुळे उद्याची पन्नास वर्षे डोळ्यासमोर ठेवून हा प्लॅन मी केला आहे, माझं स्वप्न आहे, माझी इच्छा आहे. उद्याच्या पाच वर्षांनी नगरपंचायतीची निवडणूक पुन्हा येईल त्यावेळी महाराष्ट्रात जेवढ्या नगरपंचायती आहेत. त्यात एक नंबरची नगरपंचायत मला माळेगावची करायची आहे. त्यासाठी भावकी वगैरे डोक्यातून काढून टाका, गट तट काढून टाका, असंही त्यांनी म्हटलं आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी जे इच्छुक आहेत त्यांनी…
यावेळी जिल्हा परिषद मेडद गटातून योगेश भैया जगताप यांना उमेदवारी द्यावी अशी चिठ्ठी अजित पवार यांना वाचली. ते पुढे म्हणाले यावर सह्या तर वेगळ्यांच्याच दिसत आहेत. कारखान्यावर समाधानी नाही का असंही पवार म्हणाले, त्याला कारखान्यावर संचालक केला, आता जिल्हा परिषद बहुतेक याच्या डोक्यात आमदारकीच दिसत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी जे इच्छुक आहेत त्यांनी अर्ज करा, आता मी दुपारी मुंबईला जाणार आहे. चार वाजता माझी एक मिटींग आहे. त्यानंतर मी जिल्हा परिषदेला जेवढे इच्छुक असतील त्यातील एका गटातील लोकांनाच मी आत घेईल , त्यांच्याशी चर्चा करेल. जास्त असेल तर फक्त जिल्हा परिषद आणि मग दोन तालुका पंचायत अशी चर्चा करू. पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून आपल्या विचारांच्या लोकांच्या ताब्यात आहे. जिथे जिथे आपले आमदार आहेत, तिथे तिथे त्या आमदारांना सुनील शेळके, माऊली कटके, शंकर मांडेकर हे सगळे तिथे गुंतलेले आहेत, ते मोकळी झाली की कुठली अडचण नाही. दोन्ही महानगरपालिकेमध्ये मतांची विभागणी होऊ नये म्हणून दोन्ही राष्ट्रवादीला सोबत घेऊन लढत आहोत, तशा पद्धतीचा प्रस्ताव जर बारामतीतून जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आला तर आपण त्याबाबत विचार करू, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
मग मला इकडे तिकीट कशाला मागतात
पुढे अजित पवार म्हणाले, काय काय तर माझ्याकडे अर्ज करतात आणि जे आमचे विरोधक आहेत. त्यांचे तिथे बोर्ड लावतात. शुभेच्छा शुभेच्छा….आर त्याच्या आईला…..तिकडे शुभेच्छा आणि मग मला इकडे तिकीट कशाला मागतात शुभेच्छा तर शुभेच्छा. जे नियमात बसतात ते आपले विचाराचे असावेत एवढीच माफक अपेक्षा माझ्या आहेत. जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, हवेली, मावळ, मुळशी, भोर आणि राजगड, बारामती याची जबाबदार विठ्ठलराव शिंदे यांच्याकडे दिली आहे. संभाजी होळकर यांच्याकडे इंदापूर, पुरंदर, दौंड जबाबदारी दिली आहे. छाणणी प्रक्रिया होईपर्यंत, मी काही संध्याकाळच्या सभा इथे घेण्याची शक्यता आहे, कारण मला बाकीचे बघत बघत इथलं बघावं लागेल. काही काही लोकांनी बऱ्याच काही गोष्टी माझ्या कानावर येतील अशा सांगितलेल्या आहेत याची नोंदणी घेतलेली आहे. इथून पुढे साडेतीन वर्ष निवडणुका नाहीत मागच्या काळातली पैसे आणायचो टेंडर व्हायची त्यावेळी वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या तक्रारी आल्या होत्या, त्यामध्ये सत्य आहे नाही हे तुम्ही तुमच्या अंतर्मनाला विचारा. ज्याला राजकारण करायचं आहे त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बनवू नका, ज्याला कॉन्ट्रॅक्टर बनायचं आहे त्यांनी राजकारणात येऊ नका, असं आवाहन देखील अजित पवारांनी म्हटलं आहे.
सर्वे करायला देखील दिलेला आहे
मागील काळात काही थोडे समज गैरसमज निर्माण झाले लोकसभेला पण टीकाटिप्पणी झाली. विधानसभेला पण आपण जेवढे सावरता येईल तेवढे सावरण्याचा प्रयत्न केला. माझी विनंती आहे, ज्याला काम करायचा आहे त्यांनी नुसतं पद घेऊ नका, काम करून दाखवा. संस्थांची जबाबदारीच्या बोर्डावर आहे, त्यांनी वेळ दिला पाहिजे मी माळेगावला पाहतोय काहीजण वेळ देत आहेत. बारामतीच्या सहाच्या सहा जिल्हा परिषदेच्या जागा आणि पंचायत समितीच्या 12 जागा याच्याबद्दल मी स्वतः आपल्याशी चर्चा करून निर्णय घेणार आहे, 17 जानेवारीला रात्रीच्या बारा वाजले तरी मी तुमच्यासोबत बसणार आहे. सर्वे करायला देखील दिलेला आहे साधारण कोणाचं काय मत आहे. मी अजून कोणालाही सांगितलेलं नाही. कामाला लागा म्हणून नाहीतर कोणी कोणी म्हणेल आत्ताच फोन आला होता, माझं झालंय, कामाला लागा, एकालाही सांगितलं नाही, माझ्यावर विश्वास ठेवा, असंही अजित पवार म्हणालेत.
Comments are closed.