Election Ink : इतिहास निवडणूक शाईचा, कशी तयार होते ही शाई?

मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या मतदानाला आज (15 जानेवारी 2026) सुरुवात झाली आहे. आज मतदान झाल्यानंतर लगेचच 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान प्रत्येक निवडणूकीवेळी मतदारांच्या बोटाला मतदान केल्यानंतर निळी शाई लावली जाते. ही शाई कोणी मतदान केलं आणि कोणी नाही हे सांगते. ही खूण जवळपास 10 ते 15 दिवस पुसली जात नाही. पण, ही शाई नक्की कुठं बनवली जाते? या शाईचा इतिहास नक्की काय आहे? पहिल्यांदा कधी वापरण्यात आली ही शाई? चला जाणून घेऊयात.

भारतीय निवडणूकांमध्ये वापरण्यात येणारी निळी शाई भारतातच तयार होते. ही शाई कर्नाटकातील म्हैसूर पेंट्स ऍण्ड वॉर्निंग लिं. कंपनीमध्ये तयार केली जाते. या शाईचे उत्पादन करणारी कंपनी याची किरकोळ विक्री करत नाही. फक्त ही शाई सरकार किंवा निवडणूकीशी संबंधित एजन्सी खरेदी करते आणि कंपनी त्यांना पुरवठा करते.

ही शाई लवकर जात का नाही?

निवडणूकीची शाई बनवण्यासाठी सिल्वर नायट्रेट वापरले जाते. जे आपल्या शरीरात असलेल्या मिठासोबत एकत्र होऊन सिल्व्हर क्लोराईड तयार होते. हे जेव्हा पाण्यात विरघळते तेव्हा त्वचेला चिकटून बसते. त्यामुळे कितीही प्रयत्न केला तरी ही शाई निघत नाही. तज्ज्ञांच्या मते, या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट मिसळले जाते, ज्यामुळे ही शाई सूर्यप्रकाशात आणखीन घट्ट होते.

पहिल्यांदा कधी वापरण्यात आली ही शाई?

1962 च्या सार्वत्रिक निवडणूकीत पहिल्यांदा या शाईचा वापर करण्यात आला होता. तेव्हापासून प्रत्येक निवडणूकीत हीच शाई वापरली जाते.NPL किंवा म्हैसूर पेंट ऍण्ड वार्निंश लिमिडेटने ही शाई बनवण्याची पद्धत कधीच सार्वजनिक केली नाही.

हेही वाचा – असं हॉटेल जिथं माकड करतात वेटरचं काम

Comments are closed.