तरुणींना क्रोशे फॅशनची भुरळ
पूर्वी घरातील महिला मोकळ्या वेळेत क्रोशे विणत. या विणकामातून घरातील लहान मुलांसाठी लोकरीचे आकर्षक रंगसंगतीचे मोजे, स्वेटर, मफलर, फ्रॉक बनवले जात असे.
तर घराच्या सजावटीतही हे क्रोशे म्हणजेच हाताने विणलेल्या धाग्यापासून रुमाल बनवले जात, तोरणेही बनवली जात.
पण कालांतराने महिला नोकरी करू लागल्या त्यामुळे मोकळा वेळ मिळेनासा झाला आणि क्रोशे विणनेही कमी झाले. मात्र आज हीच जुनी क्रोशेची फॅशन नव्याने आली आहे. य़ात रंगीबरेंगी धाग्याने विणलेले जॅकेट, स्वेटर, पोंचे,टॉप्स शर्ट्सचे बाजारात आलेत.

विशेष म्हणजे तरुण मुलींमध्ये याचे क्रेझ वाढले आहे. यात फ्लॉरल डिझाईन, बारीक नक्षीकाम असलेले नेक पॅटर्न तरुणींना आकर्षित करत आहेत.

वेगवेगळ्या धाग्यांनी विणलेले हे क्रोशे टॉप्स कॉलेज, पार्टीलूकसाठी एकदम परफेक्ट आहे.
मल्टीकलर क्रोशे टॉप्स प्लेन स्कर्टवर अधिक खुलून दिसतो. यामुळे तुम्हाला एक विंटेज रॉयल लूक मिळतो. यावर जर हाय हिल तुम्ही घातलीत तर सगळ्यात हटके लूक तुम्हाला मिळतो.
Comments are closed.