फडणवीसांचा लाडका बिल्डर आणि पालिका आयुक्त गगराणी यांच्या बैठकीत काय शिजले? संजय राऊत यांच्या ट्विटने खळबळ

एकिकडे महापालिका निवडणुकीची धामधुम सुरू असतानाच दुसरीकडे मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके बिल्डर यांच्यात एक बैठक पार पडल्याचे समोर आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्विट केल्यानंतर खळबळ उडाली आहे.

”आताची ताजी खबर: मुंबई पालिका आयुक्त भूषण गगरानी यांची व कमळाबाईची प्रदीर्घ चर्चा आणि बैठक संपली. देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईतील खास खजिनदार ,लाडका बिल्डर आणि गगराणी यांच्या बैठकीत काय शिजले?”, असा सवाल संजय राऊत यांनी या ट्विट मधून केला आहे.

मुंबईसह 29 महापालिकांमध्ये आज मतदान पार पडले. या मतदानादरम्यान अनेक मतदान केंद्रांवरील मतदार याद्यांमध्ये गोंधळ असल्याचे समोर आले आहे. तसेच निवडणूक आयोगाने यंदा शाईसाठी वापरलेल्या मार्करची खूण पुसत असल्याचे देखील समोर आले.

Comments are closed.