भायखळ्यात EVM मशीन मतदान केंद्रातून थेट टॅक्सीत! शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांचा घोळ पकडला
>>सतीश केंगार
मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेची वेळ संपली आहे. यातच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुंबईतील भायखळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे कार्यकर्त्यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांचा मोठा घोळ पकडला आहे. येथे मतदान प्रक्रियेची वेळ संपताच मतदान केंद्रातून ईव्हीएम (EVM) थेट टॅक्सीत जमा करण्यात आले. फक्त एक सुरक्षारक्षक असलेली ही टॅक्सी संपूर्ण विभागात मतदान केंद्रातून ईव्हीएम जमा करत पुढे जात होती. यावरच संशय आल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे कार्यकर्त्यांनी ही टॅक्सी अडवली.
याबतात माहिती देताना मुंबई प्रभाग क्रमांक २०७ च्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेच्या संयुक्त उमेदवार शलाका हरयाण म्हणाल्या की, “मतदान केंद्राच्या बाहेर टॅक्सी उभी केली होती आणि समोरच्या फुटपाथवर उभे होतो. आम्ही येथून निघत होतो, त्यावेळी आम्हाला लक्षात आलं की, ईव्हीएम मशीन मतदान केंद्रातून बाहेर आणून टॅक्सीत ठेवली जात आहे. यानंतर मी येथील निवडणूक अधिकाऱ्यांना विचारणा केली की, ईव्हीएम मशीन आपण कशी काय बाहेर आणल्या. त्यांनी सांगितलं या आरक्षित मशीन आहेत. मी त्यांना सांगितलं की, या जर आरक्षित मशीन आहेत तर, मला नंबर देऊन तुम्ही त्या मशीन माझ्यासमोर सील करा. मला दाखवा आणि पंचनाम्यात लिहून द्या.”
शलाका हरयाण म्हणाल्या की, “अधिकाऱ्यांनी आधी टाळाटाळ केली. म्हणाले, आमच्याकडे वेळ नाही. तुमच्याकडे एक तास वेळ घालवायला वेळ नसेल तर, आमची पाच वर्ष आम्ही फुकट घालवायची का? आता निवडणूक अधिकाऱ्यांना कळलं की, त्यांची चूक आहे. आता ते पंचनामा करून देण्यास तयार झाले आहे.”
इन्स्टाग्रामवर ही पोस्ट पहा
Comments are closed.