अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयानं सुरुवात, अमेरिकेचा पराभव, वैभव सूर्यवंशी ठरला अपयशी

नवी दिल्ली : अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट संघानं विजयानं सुरुवात केली आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्त्वात भारतीय संघानं पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवला आहे. भारतानं अमेरिकेला 6 विकेटनं पराभूत केलं आहे. पहिल्या मॅचमध्ये भारताकडून हेनिल पटेल यानं दमदार कामगिरी केली. हेनिल पटेल यानं  5 विकेट घेतल्या. वैभव सूर्यवंशी आज अपयशी ठरला. तो केवळ  2 धावा करुन बाद झाला. भारताच्या अभिज्ञान अभिषेक कुंडू यानं  42 धावा केल्या.

क्वींस स्पोर्टस क्लबमध्ये झालेल्या मॅचमध्ये आयुष म्हात्रेनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हेनिल पटेल यानं अमरिंदर गिल याला बाद करत पहिला अमेरिकेला पहिला धक्का दिला. हेनिल पटेलनं नियमित अंतरानं विकेट घेत अमेरिकेला धक्के देत 5 विकेट घेतल्या.  अमेरिकेनं  35 ओव्हर्समध्ये 107  धावा केल्या होत्या.  पावसाचा व्यत्यय आल्यानं भारताला विजयासाठी 96 धावा करायच्या होत्या. भारतानं हे आव्हान पार करत विजय मिळवला.

भारताचा 6  विकेटनं विजय

भारतानं अमेरिकेला 6 विकेटनं पराभूत केलं. भारताला तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिला धक्का बसला. वैभव सूर्यवंशी 2 धावा करुन बाद झाला. 4  ओव्हरमध्ये भारताच्या 1 बाद 21  धावा होत्या. यानंतर पाऊस आल्यानं मॅच बराच काळ थांबवावी लागली. वेदांत अल्पेशकुमार त्रिवेदी 2  धावा करुन बाद झाला.  विहान म्हलोत्रा 18 धावा करुन बाद झाला. आयुष म्हात्रे 19  धावा करुन बाद झाला. अभिज्ञान कुंडू यानं नाबाद 42  धावा करत भारताला विजय मिळवून दिला.

दरम्यान, अंडर-19 वर्ल्ड कपचं आयोजन नामीबिया आणि झिम्बॉब्वे यांच्याकडून करण्यात आलं आहे. वर्ल्डकपचे सामने विंडहोक, हरारे आणि बुलावायो या शहरात होणार आहेत. भारताचा संघ सहाव्यांदा अंडर 19 वर्व्ड कप जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरला आहे. भारत अ गटात असून न्यूझीलंड, अमेरिका आणि बांगलादेश या संघांचा देखील यात समावेश आहे. भारताचे ग्रुप स्टेजमधील सामने बुलावायोमध्ये होणार आहेत. तर, अंतिम सामना 6 फेब्रुवारीला हरारेमध्ये होणार आहे.

भारताचं ग्रुप स्टेजमधील वेळापत्रक

15 जानेवारी: भारत विरुद्ध अमेरिका, भारत 6 गडी राखून विजयी
17 जानेवारी : भारत विरुद्ध बांगलादेश
24 जानेवारी : भारत विरुद्ध न्यूझीलंड

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.