BMC Election Result 2026: ठाकरे बंधू की शिंदे-फडणवीस, मुंबईत कोण मारणार बाजी?; BMC च्या निकालाच
BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी काल मतदान झालं. त्यानंतर आज मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया आज सकाळी 10 वाजेपासून विविध ठिकाणच्या 23 मतमोजणी कक्षात होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण 227 निवडणूक प्रभागांकरिता एकूण 23 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतमोजणी प्रक्रियेकरिता प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय अंतर्गत अभिरक्षा कक्ष (Strong Room) व मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणांना सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), पोलिस खात्याकडून आवश्यक ती मान्यता प्राप्त झाली आहे. मतमोजणी केंद्रांची रचना व नियोजन, टेबल मांडणी, अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, तसेच अग्निशमन व वैद्यकीय सुविधा यांचा सविस्तर आढावा घेऊन त्याबाबतचा तपशील अंतिम करण्यात आला आहे.
मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस विभागाशी समन्वय साधण्यात आला आहे. आवश्यक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतमोजणीसाठी 759 पर्यवेक्षक आणि 770 सहायक यांच्यासह 770 चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची नियुक्त करण्यात आली आहे. मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांना पूर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक नियंत्रण, वाहनतळ व्यवस्था तसेच प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. निकाल जाहीर करताना अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.
Comments are closed.