क्रिकेटमध्ये नवा नियम! फलंदाजाला आता क्षेत्ररक्षणाची गरज नाही, जाणून घ्या सविस्तर

बिग बॅश लीग 2026-27 सीझनमध्ये एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे, ज्याबाबत खेळाडू देखील खूप उत्सुक आहेत. हा नियम बेसबॉल खेळातून घेण्यात आला आहे, ज्यानुसार कोणताही संघ (Designated Hitter) जो फक्त फलंदाजी करेल आणि (Designated Fielder) जो फक्त क्षेत्ररक्षण करेल निवडू शकतो. मात्र, या खेळाडूंना निवडायचे की जुन्या प्लेइंग इलेव्हनसह खेळायचे, हे संघांवर अवलंबून असेल.

डेजिग्नेटेड फलंदाज किंवा फील्डरच्या या नवीन नियमामुळे वरिष्ठ खेळाडूंना फायदा होऊ शकतो. मुख्य खेळाडूंच्या दुखापतीची शक्यता कमी करणे हा देखील या नियमाचा उद्देश आहे. यामुळे फलंदाज फक्त आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करू शकेल. विशेष म्हणजे हा नवीन नियम बेसबॉलमधून प्रेरित आहे.

या नवीन नियमामुळे पर्थ स्कॉर्चर्समध्ये सामील असलेला मिचेल मार्श आणि ॲडलेड स्ट्रायकर्सकडून खेळणारा दिग्गज फलंदाज क्रिस लिन यांसारख्या खेळाडूंची कारकीर्द लांबणीवर पडू शकते. मोठ्या वयाच्या खेळाडूंना क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत होण्याचा धोका जास्त असतो, या नियमामुळे खेळाडूचा हा धोका कमी होईल.

डेजिग्नेटेड फलंदाज आणि डेजिग्नेटेड गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाहीत, मात्र डेजिग्नेटेड क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाची भूमिका बजावू शकतो. जर एखाद्या संघाला या नियमाचा वापर करायचा नसेल, तर तो संघ सामान्य प्लेइंग इलेव्हनसह खेळू शकतो. ग्लेन मॅक्सवेलने या नवीन नियमाबद्दल म्हटले की, टूर्नामेंटमध्ये या नवीन नियमामुळे रोमांच वाढेल. संघ याचा वापर कसा करतात? हे पाहणे मनोरंजक ठरेल.

लीग सल्लागार ट्रेंट वुडहिल म्हणाले, जगभरातील खेळाडूंकडून या नियमावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे पुढील सत्रात अनेक मोठे खेळाडू बिग बॅश लीगमध्ये खेळू शकतात. हा नियम महिला बिग बॅश लीगमध्ये लागू केला जात नाहीये, परंतु भविष्यात होऊ शकतो. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने (Ricky ponting) या नियमाला योग्य ठरवत त्याचे समर्थन केले. तो म्हणाला, काही खेळाडू आपल्या कारकीर्दीच्या अशा टप्प्यावर असतात, जिथे ते क्षेत्ररक्षणात जास्त प्रभाव टाकू शकत नाहीत. जर हा नियम त्यांना मदत करत असेल तर हे नक्कीच चांगले राहील.

Comments are closed.