Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द

BMC Election Results 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत शुक्रवारी संध्याकाळी मोठा ट्विस्ट निर्माण झाला. शुक्रवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यानंतर भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या शिवसेनेने मोठी आघाडी घेतली होती. तर ठाकरे बंधूंचा (Thackeray brothers) खेळ 70 जागांच्या आतमध्ये आटोपणार, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, यंदा मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्या पॅटर्नमध्ये झालेल्या बदलामुळे शुक्रवारी संध्याकाळी मोठा ट्विस्ट निर्माण झाला. त्यामुळे दुपारपर्यंत भाजप एकहाती 100 जागांच्या पुढे जाईल, असे वाटत असतानाच आता मुंबईतील (Mumbai Election 2026) चित्र बदलताना दिसत आहे. त्यामुळे 100 जागांच्या जवळ पोहोचलेला भाजप 82 जागांपर्यंत खाली आला आहे. तर ठाकरे गटाने 57 जागांवरून 63 जागांवर झेप घेतली आहे. अजूनही मुंबईतील बऱ्याच वॉर्डांमधील मतमोजणी बाकी असल्यामुळे हे निकाल आणखी बदलू शकतात. त्यामुळे ठाकरे बंधूंनी आशा पूर्णपणे सोडलेली नाही. भाजप नेत्यांनी मुंबई जिंकल्याचा आनंद व्यक्त करायला सुरुवात केली असतानाच राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे अद्याप मौन बाळगून आहेत. त्यामुळे आता पुढील काही तासांमध्ये मुंबईच्या मतमोजणीत मोठे फेरबदल पाहायला मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Mumbai Mahanagarpalika Election Results 2026)

मुंबई महापालिका निवडणुकीत आतापर्यंत 157  जागांचा निकाल जाहीर झाला आहे, तर 72 जागांचा निकाल अद्याप बाकी आहे. मात्र, या सर्व जागा पकडून शिवसेना-भाजप युतीला अद्यापही बहुमताचा आकडा  गाठता आलेला नाही. भाजप आतापर्यंत 60 तर शिवसेना 17 जागांवर मिळून 77 जागांवर विजयी झाले आहेत. तर उर्वरीत जागांवर संमिश्र कल आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला 39 जागांवर विजय तर मनसे सहा जागांवर विजय मिळा आहे. त्यामुळे मुंबईत उरलेल्या जागांवर कोण बाजी मारणार,याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरु झाली. तेव्हापासून आतापर्यंत भाजप 82, शिंदे गट 26, ठाकरे गट 63, मनसे 7, शरद पवार गट 1, काँग्रेस 22,  अपक्ष उमेदवार 10 जागांवर आघाडीवर आहे. पुढील काही तासांमध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या जागा कमी होऊन ठाकरे गटाच्या जागा वाढल्यास मुंबईत रंजक राजकीय परिस्थिती निर्माण होऊ शकते. मुंबई महानगरपालिकेत बहुमताचा आकडा 114 इतका आहे. ठाकरे बंधूंनी काँग्रेस-वंचितशी युती केल्यास नाट्यमय घडामोडी घडू शकतात.

Comments are closed.