'एसआयआर'ला सोमवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
गोव्यासह पश्चिम बंगाल, लक्षद्वीप, राजस्थान, पुद्दुचेरीसाठी निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय निवडणूक आयोगाने गोवा, पुद्दुचेरी, लक्षद्वीप, राजस्थान आणि पश्चिम बंगालमधील मतदार यादींच्या विशेष सघन पडताळणीची (एसआयआर) अंतिम मुदत वाढवली आहे. दावे आणि आक्षेप दाखल करण्याची अंतिम मुदत आता सोमवार, 19 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भात आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या मागण्या आणि सर्व पात्र मतदारांना यादीत समाविष्ट करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सुधारित निर्णय एका पत्राद्वारे कळवण्यात आला आहे. सूचनेत आयोगाच्या 27 डिसेंबर 2025 च्या पत्राचा संदर्भ देण्यात आला आहे. ही मुदतवाढ फक्त दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी मर्यादित आहे. यामुळे मतदारांना त्यांचे तपशील पडताळण्यासाठी, आवश्यक घोषणांसह फॉर्म 6 भरून नावे जोडण्यासाठी किंवा आक्षेप दाखल करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.
Comments are closed.