उद्धव ठाकरेंनी स्वकियांचा विरोध पत्करून तिकीट दिलं, 84 वर्षीय रशीद मामूंनी संभाजीनगरमध्ये मशाल
छत्रपती संभाजीनगर रशीद मामू: छत्रपती संभाजीनगर महापालिकेत गरम पाणी वॉर्डातून नगरसेवक आणि आरक्षणामुळे महापौरपदावर वर्णी लागलेले माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ रशीद मामू यांची राज्यभर एकच चर्चा आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने रशीद मामूंना पक्षात प्रवेश दिल्यापासून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तोंडी त्यांचे नाव आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी रशीद मामूंना तिकीट दिल्यावरून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. संभाजीनगरचा प्रभाग क्रमांक 4 ब मधून त्यांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यांची लढत MIM चे खान अमीर अनवर यांच्याशी होती. पडेगाव भागातून 1300 हून अधिक मतांनी ते निवडून आले आहेत. मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या असणाऱ्या या भागात 84 वर्षांच्या रशीद मामुनी उद्धवसेनेची मशाल पेटती ठेवलीय.
रशीद मामूंच्या उमेदवारीला स्वकीयांचाच विरोध
रशीद मामूंच्या उमेदवारीला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचाही कडाडून विरोध होता. रशीद मामू यांना ठाकरे गटात प्रवेश देण्यात वरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात मतभेद झाले होते. रशीद मामूंच्या प्रचारासाठी जाणार नसल्याचेही खैरे यांनी सांगितलं होतं. रशीद मामूंच्या पक्षप्रवेशावर शिवसेनेतील अनेक बडे नेते नाराज असल्याचीही चर्चा होती. शिवसेनेत प्रवेश दिल्यानंतर ही रशीद मामू यांना मशाल चिन्हावर पडेगाव भागातून उमेदवारी देण्यात आली. प्रभाग 4 मधून त्यांनी विजय मिळवलाय. पक्षप्रवेशापासून उठलेली टीकेची झोड ते स्वकीयांची नाराजी ओढवत उद्धव ठाकरेंनी रशीद मामूंना महापालिकेचे तिकीट दिलं. सामाजिक धार्मिक समीकरणे जुळवताना रशीद मामू निवडून येतील का असे चर्चा सुरू झाल्या होत्या. नाराजी ओढवून का होईना ठाकरेंचे ‘रशीद मामू’ जिंकल्यामुळे शिवसेनेचा जीव भांड्यात पडल्याचं बोललं जातंय.
संभाजीनगर महापालिकेत शिवसेनेची कामगिरी कशी?
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने 94 जागांवर उमेदवार दिले होते. मात्र शिवसेना ठाकरे गटाला दोन आकडी विजयही मिळवता आलेला नाही. ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ सहा जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनाही भावाच्या पराभवामुळे फटका बसल्याचा दिसून आलं. एकीकडे बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेला छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचा गड राखता आला नाही. दुसरीकडे शिंदे गटाला ही छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 जागाच मिळाल्या असून भाजपने बहुमताचा आकडा गाठल्याचा चित्र आहे.
आणखी वाचा
Comments are closed.