जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांपूर्वी पुण्यात प्रकाश शेंडगेंची मोठी घोषणा, ओबीसींच्या नव्

पुण्याचे राजकारण: महानगरपालिकेची रणधुमाळी संपते ना संपते तोच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी वातावरण तापणार आहे. महानगरपालिकांपेक्षाही जिल्हा परिषद निवडणुकांचा राजकीय धुरळा अधिक उडतो. त्यामुळे या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष काय काय आराखाडे करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. ओबीसी बहुजन आघाडी या नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आल्याची घोषणा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. समविचारी पक्षासोबत युती करून जास्तीत जास्त ओबीसी उमेदवारांना सत्तेवर बसवू असं आश्वासन देखील यावेळी ओबीसी नेत्यानी पत्रकार परिषदेत दिल आहे..

ओबीसी बहुजन आघाडी लढवणार 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्या

प्रकाश शेंडगे यांनी सांगितले की, राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका ओबीसी बहुजन आघाडी लढवणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी हा पक्ष थेट सत्तेत सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी शेंडगे यांनी समविचारी पक्षांशी युती करण्याची भूमिकाही स्पष्ट केली. जास्तीत जास्त ओबीसी उमेदवार निवडून आणण्यासाठी समविचारी पक्ष, संघटना आणि सामाजिक चळवळींसोबत आघाडी करण्यास आम्ही तयार आहोत, असे  त्यांनी सांगितले .. आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाचा स्वतंत्र राजकीय आवाज निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे या निमित्ताने बोलले जात आहे .दरम्यान, ओबीसी बहुजन आघाडीच्या स्थापनेमुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

किती संस्थांच्या निवडणुका ?

राज्यात सध्या 32 जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित आहेत. यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपलेला आहे त्यामुळे या संस्थांचा कारभार प्रशासनाकडे आहे. मात्र 50 टक्के आरक्षणाची मर्यादा उलडलेल्या राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका तात्पुरत्या स्थगित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे आता केवळ 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. तर मतमोजणी दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. 13 जानेवारीपासून निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झालेली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.