IND vs NZ: कोहली-धवनचा रेकॉर्ड धोक्यात! इंदूर वनडेत कर्णधार गिल रचणार नवा इतिहास

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील वनडे मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना 18 जानेवारीला इंदूरमध्ये खेळला जाणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल, तो मालिका 2-1 ने आपल्या नावावर करेल. या महत्त्वाच्या सामन्यात कर्णधार शुबमन गिल (Shubman gill and Shreyas iyer) आणि श्रेयस अय्यर यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील.

भारतीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरला 3,000 वनडे धावा पूर्ण करण्यासाठी केवळ 27 धावांची गरज आहे. जर त्याने या सामन्यात 27 धावा केल्या, तर तो 70 डावांमध्ये हा टप्पा गाठणारा भारतीय फलंदाज ठरेल. सध्या हा विक्रम शिखर धवन (72 डाव) आणि विराट कोहली (75 डाव) यांच्या नावावर आहे.

कर्णधार शुबमन गिलला 3,000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी केवळ 70 धावांची गरज आहे. जर गिलने या धावा केल्या, तर तो केवळ 61 डावांमध्ये हा पराक्रम करणारा सर्वात वेगवान भारतीय फलंदाज ठरेल. जागतिक स्तरावर तो हशिम अमला (57 डाव) नंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.

शुभमन गिलची आतापर्यंतची कामगिरी:
एकूण डाव: 60
धावा: 2,930
सरासरी: 56.34

मागील दोन्ही सामन्यात गिलने 56-56 धावांची खेळी केली आहे. इंदूरच्या मैदानावर शुबमन गिलचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. या मैदानावर खेळलेल्या दोन्ही सामन्यांत त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. कर्णधार म्हणून आपली पहिलीच मालिका जिंकण्यासाठी गिल सज्ज झाला आहे.

Comments are closed.