भारतात टीम इंडियाला किती देशांनी वनडे मालिकेत केलं पराभूत? न्यूझीलंडला अद्याप एकदाही जमलेला नाही हा पराक्रम!

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तिसरा आणि निर्णायक वनडे सामना 18 जानेवारीला इंदूरमध्ये खेळला जाणार आहे. दोन्ही संघांकडे मालिका 2-1 ने जिंकण्याची समान संधी असेल. विशेष म्हणजे, न्यूझीलंडला आजवर कधीही भारतीय भूमीवर भारताचा वनडे मालिकेत पराभव करता आलेला नाही. मायकेल ब्रेसवेलच्या (Micheal breswell) नेतृत्वाखाली किवी संघाला हा इतिहास बदलण्याची संधी आहे.

भारतीय संघ 1974 पासून वनडे क्रिकेट खेळत आहे. गेल्या पाच दशकांत केवळ 5 देशांना भारतात येऊन भारताला वनडे मालिकेत हरवता आले आहे. यात पाकिस्तानचा रेकॉर्ड सर्वात सरस आहे.

पाकिस्तान: 6 वेळा (सर्वात जास्त)
ऑस्ट्रेलिया: 5 वेळा
वेस्ट इंडिज: 4 वेळा
इंग्लंड: 1 वेळा
दक्षिण आफ्रिका: 1 वेळा

न्यूझीलंडचा संघ आतापर्यंत भारतीय भूमीवर भारता विरुद्ध 7 वनडे मालिका खेळला आहे, पण प्रत्येक वेळी भारतीय संघानेच बाजी मारली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात भारतात आतापर्यंत एकूण 42 वनडे सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारताने 32 वेळा तर न्यूझीलंडने 9 वेळा विजय मिळवला आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. आता 2026 मध्ये न्यूझीलंडकडे पहिल्यांदाच भारतात वनडे मालिका जिंकून नवा इतिहास रचण्याची संधी असेल.

Comments are closed.