पिंपरी चिंचवडमध्ये निम्म्या प्रभागात क्रॉस व्होटिंग? पुरावा एबीपी माझाच्या हाती! त्या व्हिडीओम

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमध्ये निम्म्या प्रभागात क्रॉस व्होटिंग झाल्याची माहिती समोर आली आहे, एक घड्याळाला मत द्या आणि तीन कमळाला मतं द्या. पिंपरी चिंचवडमधील मतदारांना क्रॉस व्होटिंग (PCMC Election 2026) करा, असं आवाहन करणाऱ्या महिला उमेदवाराचा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. या अजित पवार (PCMC Election 2026) राष्ट्रवादीच्या प्रभाग 32 मधून नगरसेविका (PCMC Election 2026) झालेल्या उज्वला ढोरे आहेत. त्या आमच्यामुळं नगरसेविका झाल्या मात्र त्यांच्यामुळं प्रभागातील तीन उमेदवारांचा पराभव झाला. भाजपच्या प्रशांत शितोळे विरोधात राष्ट्रवादीच्या अतुल शितोळे यांचा अवघ्या 290 मतांनी पराभव झाला. यानंतर पक्षाने मतदारसंघात चौकशी केली. त्यानंतर उज्वला ढोरेंनी क्रॉस व्होटिंगचा प्रचार केल्याचा दावा करत राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर आरोप ही करण्यात आले आहेत.(PCMC Election 2026)

मात्र असं अजिबात झालं नाही. कदाचित ते तीन उमेदवार कमी पडले असावेत, असं म्हणत उज्वला ढोरेंनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. खरं तर यानिमित्ताने 32 प्रभागांमधील चित्र पाहिलं असता 16 प्रभागांमध्ये एकास तीन असे उमेदवार निवडून आल्याचं दिसतंय. त्यामुळं निम्म्या शहरात हा क्रॉस वोटिंगचा फंडा वापरण्यात आला का? अशी शंका या व्हिडीओमुळं घेतली जात आहे. असं खरंच झालं असेल तर अनेक उमेदवारांच्या स्वप्नांचा चुराडा स्वकीयांनी केला, असं म्हणण्याला वाव आहे, अशी चर्चा पिंपरी चिंचवडमध्ये सुरू झाली आहे. (PCMC Election 2026)

PCMC Election 2026:  समोर आलेल्या व्हिडीओमध्ये काय?

एक घड्याळाला मत द्या आणि तीन कमळाला मतं द्या. पिंपरी चिंचवडमधील मतदारांना क्रॉस व्होटिंग करा, असं आवाहन करणाऱ्या महिला उमेदवाराचा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे.

PCMC Election 2026: 32 पैकी 16 प्रभागांमध्ये हेच चित्र

प्रभाग क्रमांक 1, 5, 7, 8, 12, 13, 14, 16, 17, 19, 22, 23, 27, 30, 31 आणि 32

PCMC Election 2026:  कोणकोणत्या प्रभागात क्रॉस वोटिंग झालं?

भाजपचे 3 आणि अजित पवार राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक असलेले प्रभाग

प्रभाग क्र. 1,7,8,12,18,19,22,23,27,31,32

अजित पवार राष्ट्रवादीचे 3 आणि भाजपचा 1 नगरसेवक असलेले प्रभाग

प्रभाग क्र. 1,14,30

भाजप 2 आणि अजित पवार राष्ट्रवादी 2 नगरसेवक असलेले प्रभाग

प्रभाग क्रमांक 17

भाजपचा 3 आणि शिंदे शिवसेनेचा 1 नगरसेवक असलेले प्रभाग

प्रभाग क्रमांक १३

शिंदे शिवसेनेचा 3 आणि भाजपचा 1 नगरसेवक असलेले प्रभाग

प्रभाग क्रमांक 16

आणखी वाचा

Comments are closed.