Video: सिंग इज किंग! संघात परतताच अर्शदीपची कमाल, चौथ्याच चेंडूवर घेतली विकेट

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसरा वनडे सामना आज (रविवारी, १८ जानेवारी) खेळला जात आहे. इंदौरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी संघात पहिल्या दोन्ही संघात बाकावर बसलेल्या अर्शदीप सिंग याची अंतिम अकरामध्ये निवड करण्यात आली. तो भारताचा एक महत्वाचा खेळाडू आहे हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

न्यूझीलंडची फलंदाजी सुरू असून भारताकडून पहिले षटक अर्शदीपने टाकले. त्याने चौथ्याच चेंडूवर हेन्री निकल्सला त्रिफळाचीत केले आहे. त्याच्यानंतर हर्षित राणा यानेही डेवॉन कॉनवेला बाद केले. यामुळे न्यूझीलंड संघाचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात विकेट्स गमावून बसले.

बातमी अपडेट होत आहे..

Comments are closed.