IND vs NZ: खेळाडू की सुपरमॅन… रवींद्र जडेजानं घेतला अप्रतिम कॅच, किवी संघाला तिसरा धक्का!

IND vs NZ ODI भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना आज (रविवारी, 18 जानेवारी) इंदौर येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलने’टाॅस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात टीम इंडियामध्ये एक बदल करण्यात आला आहे. प्रसिध्द कृष्णाच्या जागी अर्शदीप सिंगची निवड झाली आहे.

टीम इंडियामध्ये निवड होताच अर्शदीप सिंगनं डावाच्या पहिल्याच षटकात त्याने विकेट घेऊन संधीचं सोनं केलं. त्याने चौथ्याच चेंडूवर हेन्री निकल्सला त्रिफळाचीत केलं. त्यानंतर दुसऱ्याच षटकात हर्षित राणाने पहिल्याच चेंडूवर डेवाॅन कॉनवेला बाहेरचा रस्ता दाखवला. 5 धावांत 2 विकेट गमावल्यानंतर किवी संघाचे विश्वासू फलंदाज (विल यंग आणि डॅरिल मिचेल) खेळपट्टीवर उतरले.

सुरुवातीच्या झटक्यातून संघाला सावरत या दोन्ही फलंदाजांनी 50+ धावांची भागीदारी रचली. मात्र डावाच्या 13व्या षटकात हर्षित राणाने विल यंगला (30) बाद केले. पण या विकेटचे श्रेय मात्र रवींद्र जडेजाला जाते. त्याने पाॅइंटवर अप्रतिम झेल घेतला.

पाहा व्हिडिओ-

दोन्ही संघाचे प्लेइंग इलेव्हन-

भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्ंधर), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड – डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, ​​डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल हे (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅकेरी फॉल्क्स, ख्रिश्चन क्लार्क, काइल जेमिसन, जेडेन लेनोक्स, निक केली, आदित्य अशोक, जोश क्लार्कसन, मायकेल रे.

Comments are closed.