IND vs NZ: शुबमन गिलची 'क्लीन बोल्ड' होऊन पाचावर धारण! जेमीसनच्या इनस्विंगरने उडवला थरार
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना इंदोरमध्ये खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 8 गडी गमावून 337 धावांचे आव्हान दिले आहे. या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. टीम इंडियाने रोहित शर्मा (Rohit Sharma & Shubman gill) आणि कर्णधार शुबमन गिल या दोन महत्त्वाच्या फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या आहेत.
रोहितला मिळालेल्या जीवदानाचा तो फायदा घेऊ शकला नाही, तर चांगली सुरुवात करूनही शुबमन गिल 23 धावांवर बाद झाला. काईल जेमीसनच्या एका अप्रतिम ‘इनस्विंगर’ चेंडूने गिलची दांडी गुल केली.
338 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मा अवघ्या 11 धावा करून बाद झाला. मात्र, दुसऱ्या टोकाला कर्णधार शुबमन गिल चांगल्या फॉर्मात दिसत होता. त्याने 4 चौकार लगावत मोठी खेळी करण्याचे संकेत दिले होते. पण सातव्या षटकांमध्ये काईल जेमीसनने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर गिल पूर्णपणे फसला. जेमीसनचा चेंडू इतक्या वेगाने आत (इनस्विंग) आला की गिलचा बचाव निष्फळ ठरला. चेंडू बॅट आणि पॅडच्या मधून थेट स्टंपला जाऊन धडकला. आपण कशा प्रकारे बाद झालो, हे पाहून शुबमन गिल सुद्धा अवाक झाला आणि काही वेळ गोलंदाजाकडे पाहतच राहिला.
Comments are closed.