वनडेमध्ये टीम इंडियाचा सर्वात मोठा 'रन चेस' किती? इंदूरमध्ये न्यूझीलंडने दिले 338 धावांचे लक्ष्य; जाणून घ्या आकडेवारी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंदूरच्या होळकर स्टेडियमवर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना खेळला जात आहे. तिसऱ्या वनडेत न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 बाद 337 धावा केल्या आहेत. आता मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियासमोर 338 धावांचे लक्ष्य आहे. अशा परिस्थितीत, वनडेमध्ये भारताचा सर्वात मोठा यशस्वी रन चेझ (धावांचा पाठलाग) किती आहे, हे येथे जाणून घ्या. तसेच, भारतीय संघ इंदूरमध्ये 338 धावांचे लक्ष्य गाठू शकेल का, हे देखील जाणून घेऊया.
भारतीय संघाने वनडेमध्ये 362 धावा करून सामना जिंकला आहे. टीम इंडियाने ही कामगिरी 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली होती. तेव्हा भारतीय संघाने कांगारूंविरुद्ध केवळ 43.3 षटकांत 362 धावा करून सामना जिंकला होता. याशिवाय इंग्लंडविरुद्धही भारतीय संघ धावांचा पाठलाग करताना 356 धावा करून सामना जिंकला होता. 2017 मध्ये भारताने हा सामना 11 चेंडू राखून जिंकला होता. तर वनडेमध्ये सर्वात मोठा रन चेझ करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेने 438 धावा करून ऐतिहासिक रन चेझ केला होता.
इंदूरच्या होळकर स्टेडियमवर न्यूझीलंड वनडेमध्ये सर्वात मोठी धावसंख्या उभारणारा संघ बनला आहे. होळकर स्टेडियमवर सर्वाधिक धावा करणाऱ्या परदेशी संघाचा विक्रम यापूर्वीही न्यूझीलंडच्याच नावावर होता, ज्यांनी 2023 मध्ये भारता विरुद्ध येथे 295 धावा केल्या होत्या. मात्र, आता किवी संघाने आपलाच विक्रम मोडीत काढत येथे 337 धावांची अवाढव्य धावसंख्या उभी करून इतिहास रचला आहे.
न्यूझीलंडसाठी डॅरिल मिचेलने पुन्हा एकदा शतक झळकावले. यावेळी मिचेलने 131 चेंडूत 137 धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून 15 चौकार आणि 3 षटकार निघाले. तर ग्लेन फिलिप्सने 88 चेंडूत 106 धावा ठोकल्या. फिलिप्सने 9 चौकार आणि 3 षटकार लगावले. कर्णधार मायकेल ब्रेसवेल 18 चेंडूत 28 धावांवर नाबाद राहिला. त्याने एक चौकार आणि तीन षटकार मारले.
Comments are closed.