World Cup 2026: भारत दौऱ्यावरून बांगलादेशचा वाद वाढला; आता पाकिस्तानही टी-20 वर्ल्ड कपमधून माघार घेण्याच्या विचारात?

क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेशच्या भारत दौऱ्याबाबतचा वाद जर मिटला नाही, तर पाकिस्तानचा संघ देखील 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्याबाबत फेरविचार करू शकतो (ICC T20 international world cup 2026).

रिपोर्ट्सनुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) सुरक्षेचे कारण देत भारत दौऱ्याला नकार दिला आहे. इतकेच नाही तर बांगलादेशने या प्रकरणात शेजारील देशाकडून (पाकिस्तान) राजनैतिक आणि क्रिकेटशी संबंधित पाठिंबा मागितला आहे.

रिपोर्टनुसार, बांगलादेश सरकारने आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून त्यांना तिथून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पाकिस्तानकडून असे संकेत मिळाले आहेत की, जर बांगलादेशचा मुद्दा सुटला नाही, तर ते स्वतः देखील वर्ल्ड कपमधील आपल्या सहभागावर पुन्हा विचार करतील.

या नवीन घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अडचणी वाढल्या आहेत. आयसीसी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, पण आता पाकिस्ताननेही बांगलादेशची बाजू घेतल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. टी-20 वर्ल्ड कपला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होत असून, यावेळी भारत आणि श्रीलंका (India and Shrilanka) या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहेत.

गेल्या वर्षी ढाका येथे झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर पाकिस्तान आणि बांगलादेशमधील संबंध सुधारले आहेत. याचा परिणाम क्रिकेटवरही दिसून येत असून दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड एकमेकांच्या संपर्कात आहेत. गेल्या वर्षी आशिया चषकादरम्यान पीसीबी अध्यक्ष मोहसीन नकवी यांना बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून पूर्ण पाठिंबा मिळाला होता.

Comments are closed.