Gardening Tips : बागकामासाठी व्हिनेगर आहे फायदेशीर, वाचा कसा करावा वापर?

घरात खेळती हवा राहावी यासाठी खिडकीत विविध प्रकारची झाडे लावली जातात. ज्यांच्या घरात बाल्कनी असेल तर तिथे छोटीशी बाग तयार करण्यात येते. या बागेतील झाडांना नियमित पाणी देणे, त्यांची काळजी घेणे अशा सर्व गोष्टी केल्या जातात. रोपांची नीट काळजी न घेतल्यास रोपांना किड लागण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बागकामात फायदेशीर ठरेल अशा एका पदार्थाविषयी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची कामे सोपी होतील. हा पदार्थ आहे व्हिनेगर.  व्हिनेगरचा वापर तुम्ही बागकामासाठी कसा करू शकता जाणून घेऊयात.

तण काढण्यासाठी –

झाडांच्या मध्ये वाढलेले तण झाडांना खराब करतात. त्यांना काढून टाकण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचा वापर करु शकता. यासाठी वाढलेले तण जिथे दिसतील त्यावर व्हिनेगर शिंपडा. जर तुम्ही झाडांसाठी विषारी कीटकनाशकाचा उपयोग करु इच्छित नसाल तर पाळीव प्राणी आणि लहान मुलांसाठी हा सोयीस्कर उपाय आहे.

टूल्स साफ करण्यासाठी –

व्हिनेगरचा वापर बागकामाचे टूल्स साफ करण्यासाठी करता येईल. यासाठी टूल्स साफ करण्यापूर्वी ते पाण्याने धुवून घ्या. आता व्हिनेगरला पाण्यात मिक्स करुन कपड्याच्या मदतीने टूल्स पुसून घ्या. यामुळे टूल्स बॅक्टेरिया फ्री होतील.

घमेला स्वच्छ करण्यासाठी –

व्हिनेगरच्या मदतीने घमेल्याला लागलेले डाग स्वच्छ करु शकता. हा सर्वात सोपा मार्ग आहे.

फूलांसाठी उपयुक्त –

रोडोडेंड्रोन आणि एजीलियासारखी काही रोपे आम्लयुक्त मातीमध्ये उगवतात. अशावेळी व्हिनेगरचा वापर करणे फायद्याचे ठरेल. यासाठी जवळपास चार लीटर पाण्यामध्ये एक कप व्हिनेगर टाका आणि झाडांच्या मातीत मिसळा.

किड्यांना दूर पळवण्यासाठी –

किडे बागेमध्ये नुकसान पोहोचवू शकतात. व्हिनेगर हे होण्यापासून थांबवू शकते. किडेकिटकं दूर पळवण्यासाठी बागेच्या किनाऱ्यांवर व्हिनेगर पसरवा. यासाठी एका बाटलीमध्ये एक कप पाणी, अर्धा कप व्हिनेगर,एक चतुर्थांश कप साखर आणि एक मोठा चमचा गूळ मिसळून झाडावर स्प्रे करा.

हेही वाचा – Aloevera Plant Care Tips: कोरफडीची वाढ खुंटल्यास काय करावे? जाणून घ्या प्रभावी उपाय

Comments are closed.