UAE चे राष्ट्रपती आज भारतात येणार आहेत.
भारतासोबत मोठा करार होण्याची शक्यता
►वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणावर संयुक्त अरब अमिरातचे (युएई) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान हे सोमवारी भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येणार आहेत. संयुक्त अरब अमिरातचे अध्यक्ष म्हणून त्यांचा हा तिसरा अधिकृत भारत दौरा असेल. तर मागील एक दशकात त्यांचा हा पाचवा भारत दौरा ठरणार आहे. भारतीय विदेश मंत्रालयाने यासंबंधी माहिती दिली आहे.
भारत आणि युएईदरम्यान सौहार्दपूर्ण, घनिष्ठ आणि बहुआयामी संबंध असून ते मजबूत राजनयिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांवर आधारित आहेत. व्यापक आर्थिक भागीदारी करार (सीईपीए), एलसीएस आणि द्विपक्षीय गुंतवणूक कराराकडून समर्थित हे संबंध दोन्ही देशांच्या व्यापारी आणि गुंतवणूक भागीदारींपैकी एक असल्याचे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
भारत आणि संयुक्त अरब अमिरातदरम्यान एक मजबूत ऊर्जा भागीदारी देखील असून ज्यात दीर्घकालीन ऊर्जा पुरवठा व्यवस्था सामील आहे. हा दौरा दोन्ही नेत्यांना भारत-युएई व्यापक रणनीतिक भागीदारीसाठी नवे आयाम स्थापित करण्याची संधी प्रदान करणार आहे. याच्या माध्यमातून परस्पर हिताच्या क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांचे आदान-प्रदानही शक्य होईल.
मजबूत द्विपक्षीय संबंध
भारत आणि युएईदरम्यान मागील काही काळात संबंध अधिकच दृढ झाले आहेत. युएई हा भारतात विदेशी गुंतवणुकीचा सातवा सर्वात मोठा स्रोत आहे. युएईने 2000 सालापासून आतापर्यंत भारतात 22 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक भारताच्या विकासक्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अशाप्रकारच्या गुंतवणुकीमुळे दोन्ही देशांदरम्यान आर्थिक सहकार्य मजबूत झाले असून भविष्यात आणखी वृद्धींगत होण्याची अपेक्षा आहे. अशास्थितीत दोन्ही देशांची मैत्री महत्त्वपूर्ण आहे.
Comments are closed.