अल्लू अर्जुनला पाहून भावुक झाली जपानी पोरगी, ‘पुष्पा 2’च्या टोक्यो इव्हेंटचा इमोशनल व्हिडीओ व्हायरल – Tezzbuzz

सुपरस्टार अल्लू अर्जुनची लोकप्रियता जगभरात आहे आणि याचाच प्रत्यय सध्या जपानमध्ये पाहायला मिळत आहे. ‘पुष्पा 2: द रूल’ 16 जानेवारी रोजी जपानमध्ये प्रदर्शित होताच अल्लू अर्जुन आपल्या कुटुंबासह टोकियोमध्ये प्रमोशनसाठी पोहोचला. यावेळी एका जपानी चाहत्यासोबतचा त्याचा हृदयस्पर्शी क्षण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये टोकियोतील मीट-अँड-ग्रीट इव्हेंटदरम्यान अल्लू अर्जुन चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो. गर्दीत त्याने एका जपानी चाहतीला ओळखले आणि स्वतः तिच्याजवळ जाऊन प्रेमाने अभिवादन केले. अल्लू अर्जुनचा हा साधेपणा पाहून ती चाहती अक्षरशः भावूक झाली आणि संवादादरम्यान तिला अश्रू अनावर झाले. तिच्या मैत्रिणींनी आणि आजूबाजूच्या लोकांनी तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न केला.

हा व्हिडीओ इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर कंचन आणि पृथ्वी यांनी शेअर केला असून, त्यावर चाहत्यांनी अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun)नम्र स्वभावाचे भरभरून कौतुक केले आहे. दरम्यान, अल्लू अर्जुन जपान ट्रिपचा कुटुंबासोबत आनंद घेताना दिसत आहे. पत्नी स्नेहा रेड्डीने सोशल मीडियावर ट्रिपचे खास क्षण शेअर केले असून, अलीकडेच अल्लू अर्जुनने टोकियोतील प्रसिद्ध सेंसो-जी बौद्ध मंदिरात कुटुंबासोबतचा फोटोही पोस्ट केला आहे.

4 डिसेंबर 2024 रोजी भारतात प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा 2: द रूल’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले असून, जगभरात सुमारे 1,871 कोटी रुपयांची कमाई करत ही आतापर्यंतची दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारी भारतीय फिल्म ठरली आहे. मात्र Sacnilkच्या आकडेवारीनुसार, जपानमध्ये चित्रपटाने पहिल्या दिवशी सुमारे 886 अ‍ॅडमिशन्स नोंदवले. तुलनेत ‘RRR’ने 8,230 तर ‘साहो’ने 6,510 अ‍ॅडमिशन्स मिळवले होते. तरीही जपानमध्ये अल्लू अर्जुनच्या फॅन फॉलोइंगची चर्चा जोरात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

टीव्हीपासून सुरुवात, सिनेमात मिळाली ओळख; पत्नीचे पाय स्पर्श केल्याने कधीकाळी हा अभिनेता झाला होता ट्रोल

Comments are closed.