IND vs NZ: ईशान-रिंकू खेळणार की नाही? न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग कशी असणार
वनडे मालिकेतील मानहानीकारक पराभवानंतर आता टीम इंडिया टी-20 मध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारतीय संघ 21 जानेवारीला न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भिडणार आहे (T20 series IND vs NZ).
क्रिकेटच्या या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये गेल्या वर्षभरातील भारताची कामगिरी अतिशय दमदार राहिली आहे. फलंदाजीमध्ये अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. तर दुसरीकडे हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर शानदार खेळ केला आहे. तरीही, कागदावर न्यूझीलंडचा संघ खूपच मजबूत वाटत आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात ईशान किशन आणि रिंकू सिंह यांना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागू शकते. नागपूरमध्ये होणाऱ्या या सामन्यात अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन डावाची सुरुवात (Openings) करताना दिसतील. तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर किंवा कर्णधार सूर्यकुमार यादव खेळू शकतात.
मिडल ऑर्डरची जबाबदारी हार्दिक पांड्यावर असेल, तर शिवम दुबे आणि अक्षर पटेल ‘फिनिशर’ची भूमिका बजावताना दिसतील. स्थानिक क्रिकेटमध्ये चांगल्या कामगिरीनंतरही, सुरुवातीच्या सामन्यात ईशानपेक्षा संजू सॅमसनला अधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे. तसेच, शिवम दुबेचा सध्याचा फॉर्म पाहता रिंकू सिंगला संधी मिळणे कठीण वाटतेय. वेगवान गोलंदाजीची कमान जसप्रीत बुमराहच्या हाती असेल. त्याला अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा साथ देतील. बुमराह-अर्शदीपची जोडी न्यूझीलंडच्या फलंदाजांसाठी घातक ठरू शकते. फिरकी गोलंदाजीची जबाबदारी वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांच्या खांद्यावर असेल, म्हणजेच रवी बिश्नोईला सध्या तरी आपली संधी येण्याची वाट पाहावी लागेल.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
Comments are closed.