IND vs PAK: एका दिवसात दोनदा भारत-पाकिस्तानचा महामुकाबला; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
क्रिकेट चाहत्यांसाठी 2026 चा फेब्रुवारी महिना खूपच रोमांचक ठरणार आहे. कारण या महिन्यात भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात एकाच दिवशी दोन महामुकाबले होणार आहेत. T20 वर्ल्ड कप 2026 आणि वुमेन्स एशिया कप राइजिंग स्टार्स 2026 मध्ये भारत विरूद्ध पाकिस्तानच्या टीम्समधील सामना 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
T20 वर्ल्ड कप 2026चा उद्घाटन सामना 7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका येथे होणार असून, या स्पर्धेत भारताचा सामना पाकिस्तानशी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. यामुळे क्रिकेट चाहत्यांना हा सामना थेट पाहता येणार आहे.
याच दिवशी थायलंडच्या राजधानीत वुमेन्स एशिया कप राइजिंग स्टार्स 2026 मध्येही भारत विरूद्ध पाकिस्तानच्या महिला संघांमध्ये सामना होणार आहे. हा सामना सकाळी 12:30 वाजता IST सुरू होईल. या दोन्ही सामन्यांच्या वेगवेगळ्या वेळा असल्यामुळे चाहत्यांना दोन्ही सामन्यांचा अनुभव घेता येईल.
वुमेन्स एशिया कप राइजिंग स्टार्स 2026 मध्ये एकूण 8 संघ भाग घेणार आहेत. भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये (ग्रुप-ए) आहेत, जिथे UAE आणि नेपाल संघही आहेत. ग्रुप-बी मध्ये बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया आणि थायलंड संघ आहेत.
पूर्ण स्पर्धेचे शेड्यूल पुढीलप्रमाणे आहे –
13 फेब्रुवारी: पाकिस्तान अ विरुद्ध नेपाळ ( AM 8:30 IST), भारत A विरुद्ध UAE (12:30 IST)
14 फेब्रुवारी: मलेशिया वि थायलंड (8:30 AM IST), बांगलादेश A विरुद्ध श्रीलंका A (12:30 PM IST)
15 फेब्रुवारी: UAE विरुद्ध नेपाळ (AM 8:30 IST), भारत A विरुद्ध पाकिस्तान A (PM 12:30 IST)
16 फेब्रुवारी: श्रीलंका अ वि मलेशिया (8:30 AM IST), बांग्लादेश A विरुद्ध थायलंड (12:30 PM IST)
17 फेब्रुवारी: भारत अ विरुद्ध नेपाळ ( 8:30 AM IST), पाकिस्तान अ विरुद्ध UAE (12:30 IST)
18 फेब्रुवारी: बांगलादेश अ विरुद्ध मलेशिया (8:30 AM IST), श्रीलंका अ विरुद्ध थायलंड (12:30 PM IST)
20 फेब्रुवारी: सेमीफायनल 1 (8:30 AM IST), सेमीफायनल 2 (12:30 PM IST)
22 फेब्रुवारी: अंतिम (12:30 PM IST)
Comments are closed.