U19 WC: टीम इंडियासह तीन संघ सुपर सिक्समध्ये, पाकिस्तानचा लढा सुरूच
झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे पुरूषांच्या १९ वर्षाखालील वनडे विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. पाच वेळेचा विजेता भारत या स्पर्धेत आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. यामध्ये भारताने पहिले दोन्ही सामने जिंकत जबरदस्त सुरूवात केली आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात अमेरिकेला ६ विकेट्स आणि बांग्लादेशला १८ धावांनी पराभूत केले. या दोन विजयानंतर भारत पुढील फेरीसाठी पात्र ठरला आहे.
या स्पर्धेच्या सुपर- ६मध्ये आतापर्यंत चार संघांनी प्रवेश केला आहे. ज्यामध्ये भारताचा समावेश असून पाकिस्तान अजूनही पोहोचलेला नाही. या स्पर्धेच्या सुपर- ६मध्ये १२ संघ पात्र ठरतात. त्यासाठी प्रत्येक गटांमधून पहिल्या तीन संघांना प्रवेश मिळतो.
या स्पर्धेत १६ संघ खेळत असून त्यांचे चार गट केले आहेत. यातील अ गटात श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि जपान आहे. ब गटात भारतासह न्यूझीलंड, अमेरिका आणि बांग्लादेशचा समावेश आहे. क गटात इंग्लंड, पाकिस्तान, स्कॉटलंड आणि झिम्बाब्वे आहेत. तर ड गटात अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि टांझानिया आहेत.
सुपर-६ साठी भारतासह अफगाणिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका पात्र ठरले आहेत.
तसेच या चारही गटांमध्ये साखळी सामने झाल्यावर जे शेवटच्या स्थानी असतील त्यांच्यात एक-एक सामना खेळला जाणार. यावरून ते स्पर्धेच्या शेवटी कोणत्या स्थानावर राहतील हे कळेल. तीन -तीन संघ असणाऱ्या सुपर-६चे सामने २५ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. साखळी सामन्यांनंतर आणखी दोन गट केले जाणार असून त्यात गट अ विरुद्ध गट ड आणि गट ब विरुद्ध गट क यांच्यात सामने रंगणार आहेत.
याचे नियोजन असे, यामध्ये गट अ मध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या संघाला गट ड च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघाविरुद्ध सामने खेळावे लागतील. तसेच गट अ मध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाला गट ड च्या पहिल्या आणि तिसऱ्या संघाविरुद्ध सामने खेळावे लागतील. गट अ चा तिसरा संघ गट ड च्या पहिल्या आणि दुसऱ्या संघाविरुद्ध सामने खेळले. असेच नियोजन गट ब आणि क असणार आहे.
सुपर-६च्या दोन्ही गटांतील पहिले दोन संघ सर्वाधिक सामने जिंकत उत्तम नेट रनरेटमुळे उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.
Comments are closed.