भाजपचा उमेदवार मुसलमानांमुळे निवडून आला, गिरीश महाजन-राहुल ढिकलेंचा ‘तो’ व्हिडिओ पोस्ट करत संजय

गिरीश महाजनांवर संजय राऊत : नाशिक महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर (Nashik Municipal Election Results 2026) राजकीय आरोप–प्रत्यारोपांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमदार राहुल ढिकले आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपला डिवचले आहे.

नाशिक महापालिकेच्या 31 प्रभागांतील 122 जागांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले होते. यामध्ये 56.76 टक्के मतदानाची नोंद झाली, जी 2017 च्या तुलनेत सुमारे पाच टक्क्यांनी कमी आहे. 16 जानेवारी रोजी झालेल्या मतमोजणीनंतर भाजप नाशिकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपला 72 जागा मिळाल्या, तर शिंदे गटाच्या शिवसेनेला 26, ठाकरे गटाला 15, काँग्रेसला 3, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला 4, मनसेला 1 आणि 1 जागा अपक्षाकडे गेली. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 30 (ड) चा निकाल विशेष चर्चेचा ठरला. या प्रभागात भाजपचे अजिंक्य साने विजयी झाले. या निकालावरून आमदार राहुल ढिकले आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

Sanjay Raut on Girish Mahajan:  “आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार”

संजय राऊत यांनी ‘एक्स’वर हा व्हिडिओ शेअर करत “आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार”, असे म्हटले आहे. या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी गिरीश महाजन आणि राहुल ढिकले यांच्या संभाषणाचा उल्लेख केलाय. राहुल ढिकले – साने निवडून आला म्हणाले अवघड आहे, तुमची कृपा, गिरीश महाजन – मुसलमानांमुळे झाला ‘चिपड्या’, बोला साहब आपको पॅनल नही निकाल के दिया तो मुझे जेल मे डाल देना, अगर मैंने तुमको वोटिंग निकाल के नहीं दिया तो…  आमदार बाई भेटू देत नवती, असा आशयाचे संभाषण राहुल ढिकले आणि गिरीश महाजन यांच्यात झाल्याचा व्हिडीओ संजय राऊत यांनी शेअर केलाय. यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून भाजपकडून या व्हिडीओवर काय प्रतिक्रिया येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Nashik Election 2026: प्रभाग 30 मधील निवडणुकीत नेमकं काय घडलं?

दरम्यान,   या प्रभागातील निवडणुकीत अजिंक्य साने (भाजप) यांनी शिंदे गटाचे उमेदवार सागर देशमुख यांचा अवघ्या सव्वातीनशे मतांनी निसटता पराभव केला. भाजपकडून तिकीट नाकारलेले माजी नगरसेवक सतीश सोनवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली होती; मात्र त्यांना सुमारे चार हजार मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे एमआयएमच्या उमेदवाराने सुमारे 4,500 मते घेत तिसरा क्रमांक पटकावला. राजकीय विश्लेषकांच्या मते, या प्रभागात एमआयएमच्या उमेदवारामुळे मतविभाजन झाले. त्यामुळे सागर देशमुख आणि सतीश सोनवणे यांना पराभव स्वीकारावा लागला. देशमुख यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे मुस्लीम बहुल भागातून त्यांना अपेक्षित मते मिळणार नाहीत, असा अंदाज होता, तो निकालातून स्पष्ट झाल्याचेही बोलले जात आहे.

आणखी वाचा

Nashik Crime Mukesh Shahane: अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणेंच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप, महिलेकडून थेट आत्मदहनाचा प्रयत्न; नाशिकमध्ये खळबळ

आणखी वाचा

Comments are closed.