गंभीरच्या विरोधात मैदानात नको नको त्या घोषणा; सर्व खेळाडू चक्रावले, कोहलीने काय केलं?, VIDEO
भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिका गौतम गंभीर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (Ind vs NZ ODI Series) खेळवण्यात आली. या मालिकेत न्यूझीलंडने भारताचा 2-1 ने पराभव केला. 38 वर्षांच्या इतिहासात न्यूझीलंडने पहिल्यांदाच भारतात येऊन टीम इंडियाचा एकदिवसीय सामन्यात पराभव केला. दरम्यान, तिसऱ्या एकदिवसीय सामना संपल्यानंतरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सामना पाहण्यासाठी मैदानात आलेले प्रेक्षक गौतम गंभीर हाय-हाय..अशा घोषणा देत आहेत. (Ind vs NZ ODI Series Gautam Gambhir)
मैदानात गंभीर हाय-हायच्या घोषणा; विराट कोहलीने काय केले?, VIDEO (crowd chants on gautam gambhir)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना संपल्यानंतर बक्षीस समारंभ सुरु होते. यावेळी रोहित शर्मा, विराट कोहलीसह टीम इंडियामधील अन्य खेळाडूही मैदानात उपस्थित होते. यादरम्यान, स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांकडून गौतम गंभीरच्या विरोधात घोषणा देण्यात येत होत्या. गौतम गंभीर हाय-हाय..अशी घोषणा काही प्रेक्षकांकडून दिल्या असल्याचे व्हिडीओमधून दिसत आहे. सदर प्रकार बघून विराट कोहलीनेही डोक्याला हात लावल्याचे दिसून आले.
न्यूझीलंडने भारतात पहिल्यांदाच एकदिवसीय मालिका जिंकली- (India vs New Zealand)
भारतीय भूमीवर न्यूझीलंडने भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. मालिकेच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 4 विकेट्सने आघाडी घेतली होती, परंतु त्यानंतर न्यूझीलंडने उर्वरित दोन्ही सामने जिंकून मालिका जिंकली. मालिकेत विराटच्या फलंदाजीने शानदार कामगिरी केली. मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर राहिला. विराट कोहलीने तीन सामन्यांमध्ये तीन डावांमध्ये 240 धावा केल्या. यामध्ये त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.