सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर पडल्यावर रोहित-विराटला किती कोटींचा फटका? पुढे किती सॅलरी मिळणार?
टीम इंडियाच्या खेळाडूंकरिता बीसीसीआय लवकरच नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा करू शकते. सध्या बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये A+, A, B आणि C अशा चार कॅटेगरी असून, प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळी वार्षिक सॅलरी ठरवण्यात आली आहे. यामध्ये A+ ही सर्वोच्च कॅटेगरी मानली जाते. या कॅटेगरीतील खेळाडूंना दरवर्षी 7 कोटी रुपये मानधन दिले जाते. सध्या या कॅटेगरीत विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे.
मात्र, आता बीसीसीआयकडून A+ कॅटेगरीच बंद करण्याचा विचार केला जात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. जर हा निर्णय प्रत्यक्षात आला, तर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. कारण, कॅटेगरी बदलल्यास केवळ दर्जाच नव्हे, तर पगारातही मोठी घट होणार आहे.
बीसीसीआय A+ कॅटेगरी का हटवू पाहत आहे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे फॉरमॅटची मर्यादा. सामान्यतः A+ कॅटेगरीत तेच खेळाडू असतात जे सातत्याने तीनही फॉरमॅट्स कसोटी, वनडे आणि टी20 खेळतात. मात्र, सध्या विराट कोहली आणि रोहित शर्मा फक्त वनडे फॉरमॅटमध्येच सक्रिय आहेत. रवींद्र जडेजाने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, वनडेमधील त्याचे भविष्यही अनिश्चित मानले जात आहे. अशा परिस्थितीत A+ कॅटेगरीत फक्त जसप्रीत बुमराह उरतो. त्यामुळेच बीसीसीआय ही कॅटेगरी बंद करण्याचा विचार करत आहे.
A+ कॅटेगरी रद्द झाल्यास, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना ग्रेड B मध्ये टाकले जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे. कारण, बीसीसीआय A कॅटेगरीत अशा खेळाडूंना ठेवू इच्छिते, जे नियमितपणे तीनही फॉरमॅट्स खेळतात. सध्याच्या सॅलरी स्लॅबनुसार, B कॅटेगरीतील खेळाडूंना दरवर्षी 3 कोटी रुपये मानधन मिळते.
सध्या A+ कॅटेगरीतील खेळाडूंना 7 कोटी रुपये मिळतात. जर विराट आणि रोहित यांना B कॅटेगरीत टाकले गेले, तर त्यांना थेट प्रत्येकी 4 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागेल. A कॅटेगरीत 5 कोटी, B मध्ये 3 कोटी आणि C कॅटेगरीत 1 कोटी रुपये दिले जातात.
Comments are closed.