Color Walking Trend: कलर वॉकिंगचा नवा हेल्थ ट्रेंड; वृद्धांपासून तरुणांमध्ये का होतोय लोकप्रिय?
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी चालणे आवश्यक आहे. आरोग्य तज्ञांकडूनही दररोज चालण्याचा सल्ला दिला जातो. लोक सहसा पॉवर वॉकिंग, जॉगिंग, ब्रीस्क वॉकिंग आणि रिव्हर्स वॉकिंग करतात. पण सध्या चालण्याचा एक नवीन ट्रेंड खूप लोकप्रिय होत आहे. तो म्हणजे कलर वॉकिंग. नाव ऐकूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. चला मग जाणून घेऊया कलर वॉकिंग नेमके काय असते आणि त्याचे आरोग्याला काय फायदे होतात? ( What is new color walking trend? )
कलर वॉकिंग म्हणजे काय?
कलर वॉकिंग म्हणजे घराबाहेर फिरायला गेल्यावर एखादा विशिष्ट रंग निवडणे आणि वॉकिंग करताना फक्त त्या रंगाच्या वस्तू शोधणे. उदाहरणार्थ, जर तुम्ही ‘लाल’ रंग निवडला असेल, तर रस्त्याने जाताना दिसणारी लाल फुले, लाल कार, एखाद्याचा लाल शर्ट किंवा लाल रंगाचा बोर्ड यांकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे. एका अर्थाने, हे वॉकिंग, मेडिटेशन आणि क्रिएटिव्हिटीचे एक कॉम्बिनेशन आहे.
हेही वाचा: Eating On Bed: बेडवर बसून जेवण्याचे अनेक दुष्परिणाम; जडतात गंभीर व्याधी; व्हा सावध !
कलर वॉकिंगचे फायदे
तणावमुक्ती
एका विशिष्ट रंगावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मेंदूतील अनावश्यक विचारांचे चक्र थांबते, ज्यामुळे मानसिक ताण कमी होतो.
जागरूकता
हे एक प्रकारचे ‘वॉकिंग मेडिटेशन’ आहे. यामुळे तुम्ही ‘वर्तमान काळात’ जगायला शिकता.
एकाग्रता वाढते
रंगांचा शोध घेण्याच्या प्रक्रियेमुळे तुमची निरीक्षण शक्ती आणि एकाग्रता सुधारते.
शारीरिक कल्याण
या निमित्ताने तुम्ही घराबाहेर पडता आणि चालण्याचा व्यायाम होतो. ज्यामुळे हृदय आणि स्नायूंना फायदा होतो.
मूड सुधारतो
निसर्गातील विविध रंग पाहिल्याने मेंदूमध्ये ‘डोपामाइन’ आणि ‘सेरोटोनिन’ सारखे हॅपी हार्मोन्स तयार होतात. त्यामुळे मूड चांगला राहतो.
हा ट्रेंड लोकप्रिय का होत आहे?
आजच्या काळात आपण सतत मोबाईल किंवा कामाच्या विचारात असतो. ‘कलर वॉकिंग’ आपल्याला डिजिटल जगातून बाहेर निघून खऱ्या जगाशी जोडायला मदत करते. हे करायला अतिशय सोपे आहे आणि यासाठी कोणत्याही जिम किंवा महागड्या उपकरणांची गरज नसते.
कलर वॉकिंग कसे करावे?
चालण्यापूर्वी स्वतःचा एक आवडता रंग निवडा. त्यानंतर निसर्गाकडे किंवा आजूबाजूला लक्ष देणे आवश्यक आहे. निवडलेला रंग कुठे-कुठे दिसतोय हे नीट पाहा. यामुळे तुमचे मन विचलित न होता एका गोष्टीवर केंद्रित होते. तुम्ही दिवसातून १० ते ३० मिनिटे कधीही हे करू शकता.
हेही वाचा: Healthy Habbits: पन्नाशीनंतर पाळा ‘या’ आरोग्यदायी सवयी; राहाल फिट अँड फाईन
Comments are closed.