INDvsNZ: नागपूरमध्ये बॅटींगची ताकद की बॉलर्सची जादू! वाचा खेळपट्टीचा रिपोर्ट
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील पहिला टी२० सामना बुधवारी (२१ जानेवारी) नागपूरमध्ये खेळला जाणार आहे. टी२० विश्वचषक २०२६ची पूर्वतयारी म्हणून ही मालिका दोन्ही संघासाठी महत्वाची आहे. नुकतेच घरच्या मैदानावर वनडे मालिका गमावल्याने भारताची मानसिक स्थिती कठीण तर न्यूझीलंडचा आत्मविश्वास वाढला आहे. यातच भारत नागपूरमध्ये विजय मिळवण्याच्या आशेने उतरणार आहे. यामुळे विदर्भ क्रिकेट असोसिएशनची खेळपट्टी कोणाला साथ देणार हे जाणून घेऊ.
नागपूरची खेळपट्टी लाल मातीची असून सूरूवातीला वेगवान गोलंदाजांसाठी पूरक आहे. त्यामुळे पहिल्या डावात जे फलंदाजी करतील त्यांच्यासाठी पॉवरप्ले महत्वाचा असणार आहे. टी२० क्रिकेटमध्ये पहिल्या डावात विदर्भाच्या खेळपट्टीवर १६०-१७५ अशी धावसंख्या असते. यावरून मोठ्या धावसंख्येचा सामना होण्याची शक्यता आहे. यावरून गोलंदांजाची मात्र दाणादाण उडणार आहे, असे दिसून येत आहे.
तसेच जर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने या खेळपट्टीवर १९० किंवा त्यापेक्षा अधिक धावसंख्या केली तर विजयाच्या संधी अधिक आहे. याचबरोबर या मैदानावर एका टी२० सामन्यात तर येथे २५० धावासंख्या झाल्या होत्या. नागपूरचे वातावरही उत्तम आहे. पावसाची कोणतीही चिन्हे नसून चाहत्यांना सामन्याचा आनंद घेता येणार आहे.
या मालिकेत पाच सामने खेळले जाणार आहेत. यातील पुढील सामना २३ जानेवारीला रायपूर येथे खेळला जाणार आहे.
टी२० मालिकेसाठी दोन्ही संघ-
भारत– सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू समन (यष्टीरक्षक), इशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, रवि बिश्नो. हर्षित राणा.
न्यूझीलंड– मिशेल सॅंटनर (कर्णधार), डेवॉन कॉनवे, टीम रॉबिनसन, रचिन रविंद्र, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, जेम्स निशम, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, कायले जॅमिसन, इश सोधी, जकॉब डफी, मॅट हेन्री, बेवॉन जकॉब्स, क्रिस्टियन क्लार्क, झॅक्री फॉउल्क्स
Comments are closed.