सीरियाच्या शद्दाती जेलमधून 1500 कैदी पळाले

सीरियाच्या सद्दादी शहरातील कारागृहातून आयएसआयएस या दहशतवादी संघटनेचे दीड हजार कैदी पळून गेल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. सीरिया सरकारने 120 दहशतवादी पळाल्याचे सांगितले आहे, तर कुर्दिश मीडिया 1500 कैदी पळाल्याचे सांगत आहे. या घटनेनंतर संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली असून पळालेल्या कैद्यांचा शोध सुरू आहे. सुरक्षा दलांनी शोध मोहीम हाती घेत पळून गेलेल्या 81 कैद्यांना पकडले आहे. बाकीच्या कैद्यांनाही लवकरच पकडले जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. या दहशतवाद्यांना जाणीवपूर्वक पळून जाण्यास मदत करण्यात आल्याचा आरोप सीरियाच्या लष्कराने केला आहे.

Comments are closed.