Maghi Ganesh Jayanti Wishes 2026: माघी गणेश जयंतीनिमित्त गणेश भक्तांना पाठवा खास शुभेच्छा !

प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी श्री गणेशांची मनोभावे पूजा-आराधना केली जाते. यंदा गुरुवार, 22 जानेवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल. असं म्हणतात की, जो व्यक्ती या दिवशी श्री गणेशांची मनोभावे पूजा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीप्रमाणेच माघी गणेश जयंतीला महत्व प्राप्त आहे. यानिमित्त तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना खास शुभेच्छा पाठवू शकता !  ( Maghi Ganesh Jayanti Wishes 2026 In Marathi )

वक्रतुंडा महाकाया
सूर्यकोटी समप्रभा ।
हे देवा, मला अडथळ्यांपासून मुक्त कर
सर्व बाबतीत नेहमी.
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा !

गजानना श्री गणराया,
आधी वंदू तुज मोरया !
मंगलमूर्ती श्री गणराया,
आधी वंदू तुज मोरया !
माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

मोदकांचा केला प्रसाद
केला लाल फुलांचा हार,
मखर झाले नटून तयार,
आले वाजत गाजत बाप्पा
सर्व गणेश भक्तांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव सर्वांना…
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा !

हेही वाचा: Maghi Ganesh Jayanti 2026: माघी गणेशोत्सव का साजरा करतात? जाणून घ्या महत्त्व आणि यंदाची तिथी

गौरीपुत्र विनायकाला मस्तक टेकवले
दीर्घायुष्य, इच्छा आणि संपत्तीच्या पूर्तीसाठी भक्तांच्या निवासस्थानाचे नेहमी स्मरण करावे.
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा !

हार फुलांचा घेऊनी,
वाहू चला हो गणपतीला,
आद्य दैवत साऱ्या जगाचे,
पूजन करूया गणरायाचे,
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा !

बाप्पा आला माझ्या दारी, शोभा आली घरी,
संकट घे देवा तू सामावून,
आशीर्वाद दे भरभरुनी,
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया !

अवघी सृष्टी करतेय नमन
झाले माझ्या बाप्पाचे आगमन
।। गणपती बाप्पा मोरया।।
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा !

हेही वाचा: Maghi Ganesh Jayanti 2026 Upay: माघी गणेश जयंतीला सुख- समृध्दीसाठी करा हे उपाय

Comments are closed.