4 दिग्गज खेळाडू OUT! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सामन्यात उतरवली धडाकेबाज प्लेइंग-11

भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला T20 सामना -11 : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघ आता टी-20 मालिकेत दमदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी ही तयारी करण्याची शेवटची संधी असेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या मालिकेद्वारे आपल्या त्रुटी सुधारण्याचा प्रयत्न करेल. त्याच वेळी, विश्वचषकाचा विचार करता योग्य ‘प्लेइंग इलेव्हन’ निवडण्याचे मोठे आव्हान संघ व्यवस्थापनासमोर असणार आहे.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली

या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी तो म्हणाला, “आगामी विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही आमच्यासाठी एक उत्तम सुरुवात आहे. आम्ही आज तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरत आहोत.”

सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

दुसरीकडे, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनेदेखील आपली रणनीती स्पष्ट केली. “आम्हालाही नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीच करायची होती. मात्र, आता फलंदाजी करताना चांगले आव्हान उभे करण्याचा आमचा प्रयत्न असेल.” यासोबतच त्याने प्लेइंग इलेव्हनमधील बदलांची माहिती दिली. या सामन्यात श्रेयस अय्यर, हर्षित राणा, रवी बिश्नोई आणि कुलदीप यादव हे अंतिम अकरा खेळाडूंमध्ये (प्लेइंग इलेव्हन) नसतील, असे त्याने स्पष्ट केले.

न्यूझीलंड संघाची प्लेइंग इलेव्हन – टिम रॉबिन्सन, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर, ख्रिश्चन क्लार्क, काइल जेम्सन, ईश सोधी, जेकब डफी

भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन – संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

हे ही वाचा –

Bangladesh T20 World Cup 2026 : मोठी बातमी : बांगलादेशला ICC चा 440 व्होल्टचा झटका, वर्ल्डकपमधून हाकलून दुसरा पर्यायी संघ पाठवणार!

आणखी वाचा

Comments are closed.