2026 टी-20 वर्ल्ड कपचा फायनल ‘या’ दोन संघांत होणार! मायकेल क्लार्कची मोठी भविष्यवाणी

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 (ICC T20 international world cup 2026) सुरू व्हायला अजून काही दिवस बाकी असतानाच, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने (Micheal Clark) केलेली एक मोठी भविष्यवाणी चर्चेत आली आहे.

44 वर्षीय क्लार्कच्या मते, या स्पर्धेचा अंतिम सामना (Final) भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळला जाईल. क्लार्कचे हे विधान अनेकांसाठी धक्कादायक आहे, कारण या स्पर्धेत इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेसारखे तगडे संघही मैदानात असणार आहेत, जे कोणत्याही क्षणी सामन्याचे पारडे फिरवू शकतात.

भारतीय संघाने आतापर्यंत दोन वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे. पहिल्यांदा 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आणि दुसऱ्यांदा 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने हे जेतेपद पटकावले होते. आगामी स्पर्धेत भारत आपल्याच घरच्या मैदानावर हे विजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाने 2021 मध्ये एरोन फिंचच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. आता फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, आगामी 2026 च्या वर्ल्ड कपमध्ये मिचेल मार्श ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करणार आहे. ऑस्ट्रेलियाला आता आपल्या दुसऱ्या टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफीची प्रतीक्षा आहे.

Comments are closed.